11 August 2020

News Flash

दया ठोंबरे

मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोटातील पुण्यातले दोन आरोपी दहा वर्षांपासून फरार

बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात आरोपी असलेले मोहम्मद रिझवान डावरे व राहिल अतुर रहमान शेख हेही पुण्यातील रहिवाशी असून, ते मागील दहा वर्षांपासून फरार आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसनाचा वादग्रस्त प्रस्ताव पालिकेत बहुमताने मंजूर

झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी विकसकाला परवानगी देण्याचा यापूर्वी नामंजूर करण्यात आलेला प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला.

शासकीय विकास आराखडय़ाच्या विरोधात महापालिका सभेत आंदोलन

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शासकीय समितीने केलेल्या विकास आराखडय़ावर बुधवारी जोरदार टीका करण्यात आली.

‘रोटाव्हायरस’ लसीकरणासाठी सुरुवातीला पुण्यातील चार तालुक्यांची निवड

‘रोटाव्हायरस’ या विषाणूमुळे होणाऱ्या उलटय़ांवरील लसीकरण प्रकल्प राबवण्यात येणाऱ्या हिमाचल प्रदेशसह पुण्यातील चार तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.

घाटीतील सिटीस्कॅन यंत्र बंदच, एमआरआय सुविधा निरूपयोगी!

शहरातील घाटी रुग्णालयामधील सिटीस्कॅन यंत्र गेल्या पाच महिन्यांपासून बंदच आहे. कारण काय, तर त्याची टय़ूब उडाली.

औरंगाबादकरांचा विघ्नहर्त्यांला निरोप

गणपतीबाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत शहरासह जिल्ह्यात गणरायाला उत्साहात निरोप देण्यात आला.

सर्दी-खोकल्याने कारागृहात ५० कैद्यांची स्वतंत्र व्यवस्था

सध्या सर्दी-खोकल्याची साथ पसरली आहे. कारागृहातील ५० हून अधिक कैद्यांना अन्य कैद्यांपासून वेगळे ठेवावे लागण्याची वेळ कारागृह प्रशासनावर आली आहे.

ई-प्रणालीचा औरंगाबादेत बोजवारा खास

‘ई-हजेरी’चा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला खरा; परंतु प्रत्यक्षात वर्षभरानंतर एकही तलाठी त्याची हजेरी मोबाईलद्वारे पाठवत नसल्याचे दिसून आले.

औरंगाबाद वॉटर युटिलिटीकडे काम देण्यावरून प्रश्नचिन्ह

औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने निविदाच भरल्या नव्हत्या, असा आरोप करीत समांतर जलवाहिनीच्या घोटाळ्यांची तक्रार दुपारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

कृत्रिम हौदामध्ये परभणीत विसर्जन

अखेरच्या दिवशी परभणीतील गणेश मंडळाने सजीव देखावे सादर करून उत्सवाचा शेवट उत्साहात आणि चतन्यपूर्ण वातावरणात केला.

‘मूर्तीचे जतन करण्यास वाघोलीत उत्खनन करावे’

वाघोली येथे अनेक पुरातत्त्व मूर्ती आहेत. घरे बांधताना नवनवीन मूर्ती सापडत असल्याने या गावात उत्खनन करावे, अशी मागणी युवराज नळे यांनी केली.

मोरयाच्या गजरात गणरायाला निरोप

गणपतीबाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत नांदेड शहर व जिल्ह्यात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

विसर्जन मिरवणुकीत मार्मिक फलकबाजी!

गणेशोत्सवाचे दहाही दिवस पाऊस न पडल्यामुळे लातूरकर चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे ‘पाऊस पडू दे’ अशी विनवणी करीत गणेशभक्तांनी बाप्पाला उत्साहात निरोप दिला. दरम्यान, मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरलेल्या अमर मंडळाने यंदाही वर्षभर झालेल्या कारकिर्दीवर केलेल्या टिप्पणीचे फलक झळकावले. विकासाच्या नावावर लातूर झाले भकास, डालडा फॅक्टरी बंद, जवाहर सूतगिरणी बंद, साखर कारखान्यांच्या अट्टहासामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळेना, […]

हिंगोलीत गणरायाला निरोप, खर्चाला कात्री, प्रसादावर भर!

यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवावरील खर्चाला कात्री लावली, तर काही मंडळांनी प्रसादावर अधिक भर दिला.

‘आपले पुणे’तर्फे नागरिकांचा विकास आराखडा प्रसिद्ध

शहरातील स्वयंसेवी संस्था व तज्ज्ञांनी एकत्र येऊन तयार केलेला विकास आराखडा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. हा नागरिकांचा विकास आराखडा आहे.

गणेशोत्सवाने उत्साही गर्दीचा उच्चांक अनुभवला

यंदाच्या गणेशोत्सवातील उत्साही गर्दीचा उच्चांक गुरुवारी कार्यकर्त्यांनी अनुभवला.

नोंदणी झालेल्या ५६ हजार मुलांपैकी शाळेत किती?

राज्यातील ५६ हजार मुले अद्यापही शाळेपर्यंत पोहोचू शकली नसल्याची नोंद राज्याच्या शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वी केली.

धरणातून रविवारी पाणी सोडण्याचा निर्णय

गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून ०.०७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शुल्क परताव्याच्या मुद्दय़ावर शासन सर्वोच्च न्यायालयात

आरक्षित जागांवर पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्कही शासनाने द्यावे, अशा निर्णयाला राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

अटक आरोपीकडून दोन खून उघडकीस

वारजे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याने दोन जणांचे खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर मोटारी, एसटीला टोलमुक्ती शक्य

दरवर्षी मिळणारे टोलचे उत्पन्न लक्षात घेता सर्वसामान्यांच्या वाहनांची टोलमुक्ती शक्य असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

तीन हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे पैसे मेकॅन्झीकडून घ्या

कर्मचाऱ्यांच्या आठ दिवसांच्या वेतनाएवढी रक्कम मेकॅन्झी कंपनीच्या सल्लागार शुल्कातून वजा करून मगच कंपनीला पैसे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

पानसरे हत्याप्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण नको – गृहराज्यमंत्री राम शिंदे

कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात विनाकारण ‘मीडिया ट्रायल’ करून तपासाला वेगळे वळण देऊ नये, असे आवाहन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केले.

जुन्या हद्दीचा विकास आराखडा शनिवारी शासनाला सादर होणार

जुन्या हद्दीसाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी समितीने आराखडय़ाला अंतिम रूप दिले असून हा आराखडा शनिवारी (२६ सप्टेंबर) शासनाला सादर केला जाणार आहे.

Just Now!
X