Mumbai News Today : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन अद्यापही सुरू आहे. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांनी उपोषण काल (१४ सप्टेंबर) मागे घेतलं. यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवली सराटी येथे उपोषणस्थळी पोहोचले होते. दरम्यान, जम्मू काश्मिरातील दहशतवादी हल्ला, भाजपा कार्यालयात झालेली पुष्पउधळण, सनातन धर्म आदी मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. तर, दुसरीकडे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगितलं जातंय. यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
Maharashtra News Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेकडून आंदोलन केलं जात होतं. या आंदोलनाचं वृत्तांकन करायला गेलेल्या माध्यम प्रतिनिधींसोबत पोलिसांनी धक्काबुक्की केली. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. मनसे कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मापदंडापेक्षा जादा पाणीवापर आणि सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडण्याची जबर किंमत महापालिकेला मोजावी लागणार आहे.
कल्याण- डोंबिवली, कल्याण शहराच्या वेगळ्या भागात तीन वेगळ्या घटनांमध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये एका १७ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा समावेश आहे.
याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या चित्रणाच्या मदतीने आरोपी शेरअली शेख (४०) याला अटक केली.
नवी मुंबई: मोरबे धरणाच्या उभारणीसाठी सुरुवातीला गुंतवलेले १०८ कोटी रुपये परत करा अथवा ९० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी तरी असा धोशा लावणाऱ्या सिडको प्रशासनाला या मुद्याावर अजिबात दाद द्याायची नाही असा निर्णय महापालिका प्रशासनाच्या स्तरावर घेण्यात आला आहे.
डोंबिवली- येथील पूर्व भागातील फडके रस्ता वाहतूक विभागाने एक दिशा मार्ग केला आहे. या रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी आहे. या रस्त्यांवरुन मागील काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकाकडून येणारी वाहनेही सकाळ, संध्याकाळ फडके रस्त्यावरुन गणेश मंदिर दिशेने उलट मार्गिकेतून धावत असल्याने या रस्त्यावर अलीकडे सकाळ, संध्याकाळ कोंडी होत आहे.
नागपूर : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर शनिवारी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला.
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेना ठाकरेगटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद (३०) यांची पतीने मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दोन मुलांच्यासमोर चाकूने भोसकून हत्या केली.
नागपूर : धार्मिक स्थळाजवळ घर असलेल्या विधवा महिलेच्या सौंदर्यावर भाळलेल्या एका अभियंता तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिचे दोन वर्षे लैंगिक शोषण केले, या प्रकरणी विधवेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
यवतमाळ : वाळू डेपोची तक्रार मागे घेण्यासाठी बंदुकीच्या धाकावर पाच लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री मारेगाव कोसारा शिवारात घडली. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला गजाआड केले.
नागपूर : राज्यात ३० ऑगस्टच्या दरम्यान विजेची मागणी २६ हजार मेगावाॅटवर गेल्यावर विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने एफ गटातील फिडरवर महावितरणला भारनियमन करावे लागले. त्यानंतर पावसामुळे ही मागणी घसरून २१ हजार २३८ मेगावाॅटवर आली होती.
रेडझोन, प्राधिकरण मालकीच्या जागेवर राहणाऱ्यांसाठी हा निर्णय आहे. शहरातील इतर भागांसाठी याचा वापर करता येणार नाही.
नागपूर : नागपुरातील प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालय क्षेत्रात गेल्या पाच वर्षांमध्ये आयकरातून मिळणारा महसूल अडीच पटींनी वाढला आहे. २०१८- १९ पासून २०२२-२३ पर्यंत करोनाचे एक वर्ष (२०२०- २१) सोडले तर इतर वर्षात सातत्याने महसूलात वाढ नोंदवली जात आहे.
लष्कराने समिती नेमली असून, या समितीमध्ये महापालिकेचा एकही सदस्य नसल्यानेही महापालिकेने कटक मंडळ घेण्यास विरोध दर्शविला आहे.
मराठावाडा मुक्तीसंग्राम दिन उद्या साजरा केला जाणार आहे. याकरता सरकारकडून मोठ्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊतही मराठवाड्यात दाखल झाले आहेत. परंतु त्यांनी सरकारवर टीकास्र डागलं आहे. मराठवाड्यासाठी जाहीर केलेला विकासनिधी कुठे गेला असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.
कोरेगाव भीमा येथील लढाई कोणत्याही विशिष्ट जाती, धर्माशी जोडता येणार नाही, या दाव्याला त्यांनी आयोगासमोर दुजोरा दिला नाही.
भाजप नाशिक महानगरची २०२३-२६ या कालावधीसाठीची कार्यकारिणी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी जाहीर केली.
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नव्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवार व रविवारी हैदराबादमध्ये होत आहे. १७ सप्टेंबर रोजी सोनिया गांधींच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेतून काँग्रेसच्या तेलंगणासह पाचही राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होईल.
पिंपरी: मोशी- बोऱ्हाडेवाडी येथील पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीच्या उभारणीला आता गती मिळाली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ८६ कोटी २४ लाख ५१ हजार १६६ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.
पुणे: गणेशोत्सवात शहरासह जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीची सर्व दुकाने १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत.
पुणे: हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या ‘पुणेरी मेट्रो’ प्रकल्पाचे काम वेगाने पुढे सरकत आहे.
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे ९ आमदारासह २ जुलै रोजी सहभागी झाले. त्यानंतर राज्यात होणार्या अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्याकडून आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नियामक मंडळाची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
डरपोक आणि बेकायदा सरकार असून प्रत्येक संकटातून सरकार पळून जातंय. देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काश्मीरमध्ये कर्नल, मेजर डीएसपी शहीद झाले. चार जवान लष्करी अधिकारी एकाच वेळेला शहीद होतात. सारा देश दुःखसागरात बुडाला हे ऐकून. आणि आमचे पंतप्रधान तिथे दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयात स्वतःवर फुलं उधळून घेतली. चार जवांनांनी हौतात्म्य पत्कारलं आणि आमचे पंतप्रधान आणि भाजपा दिल्लीतील कार्यालयात उत्सव साजरा करत होते. हा त्यांचा सनातन धर्म आहे. हा आमचा सनातन धर्म नाही. हा त्यांचा भारत वेगळा आहे, तो आमचा भारत नाही. जे जवान शहीद झाले ते भारताचे सुपूत्र होते. नुसतं इंडियाचं भारत केलं राजकीय कारणासाठी हे ढोंग बंद केलं – संजय राऊत
महाराष्ट् न्यूज लाइव्ह
Maharashtra Live News Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा