Mumbai Pune Nagpur News Updates 09 june 2025: मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जणाऱ्या लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात लोंबकळत होते. त्याचवेळी लखनौला जाणारी पुष्पक एक्सप्रेस लोकलच्या बाजूने जात होती. या एक्सप्रेसला घासून लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी खाली पडले असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तसेच,कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानाचा पारा चाळीशीपार पोहोचला आहे.

या घडामोडींची तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या..

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 09 june 2025

17:46 (IST) 9 Jun 2025

पालघर : शहरातील गटाराच्या झाकणांची धोकादायक स्थिती कायम, वाहतुकीच्या मार्गावर अपघाताला आमंत्रण

मुख्य रस्त्यांवर असलेल्या भूमिगत गटारांवर सिमेंटचे अथवा पत्र्याचे झाकण तुटून दुरावस्था झाली आहे. तसेच अनेक गटारांवर झाकणच नसल्याने गटारी उघडी पडली आहेत. …वाचा सविस्तर
17:34 (IST) 9 Jun 2025

बच्चू कडूंच्या आंदोलनाला राकेश टिकैत यांचे बळ, गुरूकूंज मोझरी गाठून म्हणाले, “हे सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून….”

राकेश टिकैत म्हणाले, आम्ही केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सरकारची नाकेबंदी केली. अजूनही आमचा संघर्ष सुरूच आहे. …सविस्तर वाचा
17:30 (IST) 9 Jun 2025

या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार, प्रवाशांच्या संतापजनक प्रतिक्रिया; रेल्वे गाड्यांची संख्या वाढवाव्या प्रवाशांची मागणी

गर्दीच्या वेळा सोडल्या जाणाऱ्या वातानुकूलित रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. …अधिक वाचा
17:25 (IST) 9 Jun 2025

भंडारा : अनियंत्रित ट्रेलरच्या धडकेत युवकाचा मृत्यू…

बसस्थानकावरून घरी परत जात असताना मागून आलेल्या एम एच ४० सी एम २७८५ क्रमांकाच्या ट्रेलरने त्याला जोरदार धडक दिली. …वाचा सविस्तर
17:19 (IST) 9 Jun 2025

पश्चिम व दक्षिण भारताला जोडणाऱ्या रेल्वेला मुदतवाढ, गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा

गाडी क्रमांक ०७०६२ भावनगर-हैदराबाद साप्ताहिक समर स्पेशल गाडी आता २९ जूनपर्यंत चालवण्यात येईल. …वाचा सविस्तर
17:12 (IST) 9 Jun 2025

वेळापत्रकाविना शिक्षक बदली पोर्टल सुरू, सूचना नाही व रिक्त जागांची घोषणाही नाही…

संवर्ग एक व दोनमध्ये असणाऱ्या शिक्षकांनी बदलीतून सूट हवी आहे का, याबाबतचे होकार व नकार भरण्याच्या सूचना बदली पोर्टलवर शनिवारी सायंकाळी जाहीर केल्या आहेत. …अधिक वाचा
17:12 (IST) 9 Jun 2025

घाम येत होता म्हणून दारात गेला आणि…

Mumbra Thane Train Accident : काही काळ घाम येत होता म्हणून केतन दारात गेला, पण दिव्यात लोकल गाडीत मोठी गर्दी झाली. दिव्यावरून गाडी निघाली आणि मुंब्र्याजवळ येताच बाजूने एक लोकल जोरात गेली. लोकलमधल्या कुणाचीतरी बॅग लागली आणि केतन पडला. …सविस्तर बातमी
16:17 (IST) 9 Jun 2025

पीओपी मूर्तींवरील बंदी उठली, सीपीसीबीची उच्च न्यायालयात भूमिका, विसर्जनाचा मुद्दा राज्य सरकारच्या कोर्टात

पीओपी मूर्तीसंदर्भातील आपण आखलेली मार्गदर्शक तत्त्वे ही केवळ सूचना किंवा शिफारसींच्या स्वरूपात आहेत, असे देखील सीपीसीबीतर्फे उपरोक्त भूमिका मांडताना स्पष्ट करण्यात आले. …सविस्तर वाचा
15:55 (IST) 9 Jun 2025

मुंबई, पुणे अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत… नागपुरातही नदी-नाले, गटर…

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गजानन पांडे म्हणाले, पुणे, मुंबई व इतर शहरामध्ये अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे वित्तहाणी झाली.

सविस्तर वाचा…

15:54 (IST) 9 Jun 2025

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयपीएस अधिकारी शहीद, छत्तीसगडमधील सुकमा येथे….

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता नक्षलवादी स्फोटके २ फूट किंवा त्याहून अधिक खोल रस्त्याखाली लपवत आहेत.

सविस्तर वाचा…

15:53 (IST) 9 Jun 2025

नरेंद्र मोदी पंतप्रधान का बनले? सरन्यायाधीश भूषण गवईंनी थेट लंडनमधून सांगितले…

अलिकडेच सरन्यायाधीश पदाची शपथ घेतलेल्या न्या.भूषण गवई यांनी मोदी यांच्या पंतप्रधान यांच्या पदावर भाष्य केले आहे.

सविस्तर वाचा…

15:52 (IST) 9 Jun 2025

ठाणे रेल्वे पोलिसांनी सुरू केली मुंब्रा अपघाताची चौकशी

Mumbra Thane Train Accident : या घटनेबाबत ठाणे रेल्वे पोलीसांकडून चौकशी सुरु असुन योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत, असेही पोलिसांनी म्हटले आहे. …सविस्तर बातमी
15:35 (IST) 9 Jun 2025

मुंब्रा स्थानकाजवळील अपघाताचे कारण चौकशीत समोर येईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून या अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले आहे. …वाचा सविस्तर
15:23 (IST) 9 Jun 2025

मुंबई रेल्वे प्रवासी संघाकडून डिआरएम (DRM) यांच्यावर कारवाईची मागणी

या अपघाताची जबाबदारी DRM ने स्वीकारावी. रेल्वे बोर्डने मुंबई लोकल रेल्वे व्यवस्थापनात हस्तक्षेप करणे थांबवावे आणि स्वतंत्र मुंबई लोकल प्रशासन निर्माण करावे. असे संघाने निवेदनात म्हंटले आहे. …अधिक वाचा
14:56 (IST) 9 Jun 2025

कसारा- कर्जत प्रवाशांनी रेल्वेवरच का अवलंबुन राहावे ? उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडेंचा सवाल

या अपघातामुळे कसारा – कर्जत भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. …वाचा सविस्तर
14:09 (IST) 9 Jun 2025

Mumbai Local Accident : मुंब्र्याचे ते वळण प्रवाशांसाठी ठरले प्राणघातक

Mumbai Train Accident : मुंब्रा रेल्वे स्थानक भागात अतिजलद लोकलची नवीन रेल्वे मार्गिका अतिशय वाकदार आहे. या वळण मार्गावर लोकल रूळावरून लवचिकतेने वेगाने धावते. या खालीवर वेगाने धावणाऱ्या रेल्वे मार्गाने मुळे हेलपाटले जाऊन रेल्वे मार्गात पडतात, असे जाणकार रेल्वे प्रवाशांनी सांगितले. …अधिक वाचा
14:08 (IST) 9 Jun 2025

Mumbai Local Accident : रोजच गर्दीमुळे प्रवासात अपघाताची भीती; बदलापूर, अंबरनाथकर करत आहेत जीवघेणा प्रवास

Mumbai Train Accident : मुंबई, उपनगरातून परतीचा प्रवास करून आलेल्या बहुतांश प्रवास लटकंती करत झालेला असता. त्या स्थानकात उतरल्यानंतर फलाटावर मोठी गर्दी असते. …अधिक वाचा
13:32 (IST) 9 Jun 2025

भीषण अपघात की व्यवस्थेचा दोष? रोहिदास मुंडे यांचा संताप

प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबांचे आधार आहेत. या निष्पाप प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. जबाबदारांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, असे मुंडे यांनी सांगितले. …सविस्तर वाचा
13:28 (IST) 9 Jun 2025

बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलनाचा निर्धार कायम, आमदार रोहित पवार यांचा पाठिंबा

उपोषणस्थळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राज्यभरातून प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, दिव्यांग बांधव हे मोझरी येथे दाखल होत आहेत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी नेते भेट देणार असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
13:09 (IST) 9 Jun 2025

Mumbra Local Train Accident : मुंब्रा रेल्वे अपघातात कॉन्स्टेबलचा मृत्यू

मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातांच्या प्रकरणानंतर आता प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. …वाचा सविस्तर
12:21 (IST) 9 Jun 2025

पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर, अजित पवारांनी व्यासपीठावर टाळलं शरद पवारांच्या बाजुला बसणं

पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ‘एआय’ बाबतचे चर्चा सत्राचे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे. …सविस्तर वाचा
11:44 (IST) 9 Jun 2025

मोदींची ११ वर्ष, “बोलाचीच कढी अन् , बोलाचाच भात” सपकाळ यांची टीका

शेतकरी उत्पन्न दुप्पट, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खिशात १५ लाख देणार, अण्णा हजारे, बाबा रामदेव यांनी पेट्रोलचे दर कमी करणार, लोकपाल याच काय झालं याच उत्तर मोदींनी दिलं पाहिजे, असे सपकाळ म्हणाले. …अधिक वाचा
11:21 (IST) 9 Jun 2025

लग्न सोहळ्यात प्रेम, समर्पण आणि समाजसेवेचा मिलाप

हा विवाह सोहळा संपूर्ण समाजासाठी एक संदेश होता. खरे सौंदर्य झगमगाटात नसते, तर संवेदनशीलतेत असते. खरे वैभव खर्चात नाही, तर दिलेल्या मदतीत आणि हास्यात असते, अशी साद या विवाहाने चंद्रपूरच नव्हे तर समस्त समाजमनाला घातली. …सविस्तर बातमी
11:17 (IST) 9 Jun 2025

Pushpak Express Accident : आठ प्रवाशांची मृत्यूशी झुंज सुरू; कळवा रुग्णालयात डॉक्टरांचं विशेष पथक तैनात

Mumbai Train Accident : या घटनेत पाच जण जखमी झाले आहे. जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. …सविस्तर बातमी
11:17 (IST) 9 Jun 2025

मुंबई विद्यापीठाने मालमत्ता कर थकवला; पालिकेचा २१ कोटींचा मालमत्ता कर थकीत

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाचा तब्बल २१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. …अधिक वाचा
11:10 (IST) 9 Jun 2025

मुंबईत भर गर्दीच्या परिसरात एटीएम फोडले…

कुर्ला पूर्व येथे एटीएम मशीन फोडून तीन चोरट्यांनी तीन लाखांची रोख रक्कम चोरल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. …सविस्तर वाचा
11:08 (IST) 9 Jun 2025

चंद्रपूर : संडे मार्केटचे अतिक्रमण निर्मूलन कधी?

एखाद्याचा बळी गेल्यानंतरच ‘संडे मार्केट’चे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासकाला जाग येणार का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. …सविस्तर बातमी
11:03 (IST) 9 Jun 2025

राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार’या’ भागात पावसाचे संकेत

बंगालच्या उपसागरात या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे असून पुढील ४८ ते ६० तासांत विदर्भ व महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. …अधिक वाचा
10:55 (IST) 9 Jun 2025

चंद्रपूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे भाजपमध्ये

डोंगरे यांचा भाजप प्रवेश हा वडेट्टीवार यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. यापूर्वी वडेट्टीवार यांचे विश्वासू ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष रिता उराडे आणि नगरसेवक विलास विखार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. …सविस्तर बातमी
10:44 (IST) 9 Jun 2025

सरकारला दिलासा: भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप स्थगित

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेने अमरावती नागपूर विभागात २६ मे पासून बेमुदत संप सुरू केला होता. …सविस्तर बातमी

मुंबई पुणे नागपूर पाऊस ब्रेकिंग लाईव्ह न्यूज टुडे