नागपूर : आम्हाला अटक झाली तरी चालेल, मात्र राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात जिथे- जिथे सभा होतील त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा ओबीसी समाजासह अनुसूचित जाती जमाती समाजातील नागरिक त्यांचा निषेध करतील, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. राहुल गांधी यांनी आरक्षणाला विरोध केला आहे महाराष्ट्रात त्यांना त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रश्न विचारणार आहे. त्यांच्या पोटात होते ते ओठावर आले. काँग्रेसचा सुरुवातीलपासून आरक्षणाला विरोध आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात खोटा प्रचार करत मोदी सरकारची बदनामी केली आहे. आता जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. ओबीसी समाजाचे नेते म्हणविणारे नाना पटोले हे राहुल गांधींच्य वक्तव्यावरून माफी मागणार आहे का? . मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले पाहिजे, त्यांना राहुल गांधी यांचे वक्तव्य मान्य आहे का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा…बुलढाणा : “राहुल गांधींनी बाबासाहेबांची माफी मागावी, तरच…’ संजय गायकवाड यांनी सुचवला पर्याय

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकार अस्थिर असल्याची टीका केली असली तरी त्यांचे काँग्रेसमध्ये अस्तिव अस्थिर आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

हे ही वाचा… राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक ; पोलीस आयुक्तांच्या कक्षात ठिय्या

लोकसभेच्या आधी मोदी सरकारने देशासाठी काय योगदान दिले आहे ते आम्ही जनतेसमोर मांडले होते. पण त्यावेळी विरोधी पक्षा्ंच्या नेत्यांनी खोटा प्रचार करताना मतदारांना कन्फ्युज केले. आम्ही शंभर दिवसात काय केले आहे ते आता सरकारसमोर घेऊन जाणार आहे. संविधानाला आणि आरक्षणाला काँग्रेसचा विरोध हे जनतेला पटवून देणार आहे. केंद्रात २०२९ पर्यंत आम्ही सत्तेत आहे, राज्यात सरकार आल्यास केंद्र व राज्य सरकार असलेले डबल इंजिन सरकार जोरदार काम करणार आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याते काम केले जात आहे. आता ८६ हजर कोटी वर्षाला आदिवासी भागासाठी देत आहे. काँग्रेस आदिवासी काहीच मदत केली नाही. त्यांचा खोटारडेपणा समोर येईल., असे बावनकुळे म्हणाले

गायकवाड, बोंडेंच्या वक्तव्य…

संजय गायकवाड किंवा अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही. पण राहुल गांधी यांनी सांभाळून बोलले पाहिजे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले विचारपूर्वक बोलले, करोना काळात भारत मजबूत ठेवण्याचे काम करणाऱ्या भारताची बदनामी राहुल गांधी करत असतील आणि आठवले यांनी त्याचा पासपोर्ट जप्त करा असे वक्तव्य केले असेल तर त्याला समर्थन आहे. असे बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा…पंतप्रधानांचा दौरा अन् प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज दिवसभर जिल्ह्यात…

सुप्रिया सुळेंबाबत…..

शरद पवार यांना सुप्रिया सुळे याना मुख्यमंत्री करायचे आहे, कॉंग्रेसमध्ये सध्या आठ मुख्यमंत्री फिरत आहे तर उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत असले तरी शरद पवार यांना सुप्रीया सुळे यांनाच मुख्यमंत्री करायचे आहे आणि त्यासाठी सर्व आटापिटा सुरू असल्याचे बावनकुळे म्हणाले.