-
छोट्या पडद्यावरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मृणाल दुसानीस नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. अमेरिकास्थित नीरज मोरे याच्याशी मृणालचा विवाह झाला आहे.
-
२५ तारखेला नाशिकमध्ये मृणाल आणि नीरजचा विवाहसोहळा पार पडला. मुळचा पुण्याचा असलेला नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
-
छोट्या पडद्यावर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’ या मृणालच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या.
-
मृणाल लॉस एजंलिस येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त गेली असताना नीरज मोरेसोबत तिची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये संवाद वाढा आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
या लग्नाला असं सासर सुरेख बाई या मालिकेतील मृणालच्या सहकलाकारांनी हजेरी लावली होती.
-
मृणाल मूळची नाशिकची तर नीरज पुण्याचा आहे.
-
अमेरिकतून एमएस केल्यानंतर नीरज आता लॉस एंजिलिस येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतोय. पुढची किमान दोन वर्ष तरी तो अमेरिकेतच राहणार असल्यामुळे मृणालही तिची मालिका संपल्यावर अमेरिकेत जाणार आहे.
-

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल