-
निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्यांना मोहात पाडत आणि पेशवाई संस्कारात घडत असलेल्या आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आहेत.
-
'स्वामिनी' या लोकप्रिय मालिकेत आता रमाबाई मोठ्या झालेल्या दिसणार आहेत.
-
मोठ्या रमाबाईंची भूमिका कोण साकारणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
-
आता या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला असून अभिनेत्री रेवती लेले मोठ्या रमाबाईंची भूमिका साकारणार आहे.
-
सरकारनं शूटिंगसाठी आखून दिलेल्या नियमावलीत कास्टिंगबद्दलही काही मार्गदर्शक सूचना होत्या. त्यामुळे रेवतीची कास्टिंग व्हर्च्युअल माध्यमातून करण्यात आली.
-
रेवती लेले ही अभिनेत्रीसोबतच उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.
-
'स्वामिनी' ही तिची प्रमुख भूमिका असलेली पहिलीच मालिका आहे.
-
रमाबाईंची भूमिका ती कशी साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
रमा एका सामान्य घरात वाढलेली निरागस मुलगी जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले. आता ती भावी काळात येणार्या जबाबदार्या कशी पार पाडेल? माधवराव आईच्या विरोधात जाऊन तिला कशी साथ देतील? रमा आणि माधव यांचा हा प्रवास कसा होता? त्यांना कोणाची साथ लाभली? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम/ रेवती लेले)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”