‘गो बॅक मोदी’ म्हणत प्रकाशझोतात आलेली ओविया हेलन आहे तरी कोण?
- 1 / 13
दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात असंतोष वाढत चालला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी पंतप्रधानांच्या ध्येयधोरणांवर टीकास्त्र डागलं आहे. यामध्येच आता दाक्षिणात्य अभिनत्री ओविया हेलन हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींविरुद्धचा राग व्यक्त केला आहे. (सौजन्य : ओविया हेलन फेसबुक पेज)
- 2 / 13
अलिकडेच ओवियाने 'गो बॅक मोदी', असं ट्विट सोशल मीडियावर शेअर केलं. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा सुरु झाली.
- 3 / 13
पंतप्रधानांविरोधात ठाम भूमिका घेणारी ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण हे जाणून घेण्याची नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
- 4 / 13
ओविया ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
- 5 / 13
हेलेन नेल्सन असं ओवियाचं पूर्ण नाव असून २००७ साली तिने कांगारु या दाक्षिणात्य चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली.
- 6 / 13
'मुथुकु मुथागा' या चिपटामुळे तुफान लोकप्रिय झालेल्या ओवियाने 'नालाय नमधे', 'मरिना', 'अपूर्वा','कालवनी' या सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
- 7 / 13
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या ओवियाला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
- 8 / 13
अभिनयासोबत ओविया सोशल मीडियावर सक्रीय असून समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ती उघडपणे व्यक्त होत असते.
- 9 / 13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ट्विट केल्यानंतर ओवियाच्या या ट्विटमागील हेतूचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे.
- 10 / 13
ओवियाला फोटोशूट करण्याची विशेष आवड आहे.
- 11 / 13
ओवियाचं खास फोटोशूट
- 12 / 13
निखळ आणि मनमोहक हास्य
- 13 / 13
ओविया हेलन