-
शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याने त्याच्या उत्तम अभिनयमुळे लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शाहरुखचे हिंन्दी सिनेमातील करियर ९०च्या दशकात सुरू झाले.
-
बॉलिवूडमध्ये येताच तो फेमस झाला. इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय कलाकार असल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब सतत लाइमलाइटमध्ये असते.
-
शाहरुख खान जरी सतत लाइमलाइटमध्ये असला तरी त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनी मनोरंजन क्षेत्रापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊयात शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाविषयी माहीत नसलेल्या या गोष्टी.
-
शाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ साली दिल्लीमध्ये झाला.
-
त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद, यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले आहे. त्याच्या वडीलांचे अनेक बिझनेस होते. त्याच्या आईचे नावं लतीफ फातिमा होते.
-
शाहरुख खानच्या वडीलांचे निधन तो लहान असताना झाले आणि काही वर्षांनी त्याच्या आईचेही निधन झाले. दोघांचेही कॅन्सरने निधन झाले.
-
शाहरूख खानला एक मोठी बहीण आहे जिचे नावं शहनाज आहे. आई- बाबाच्या निधनानंतर ती डिप्रेशनमध्ये होती.
-
शहनाज तिच्य भावासोबत त्यांच्या मन्नत बंगल्यात राहते. मात्र तिला कॅमेरा समौर यायला आवडत नाही.
-
कॉलेजच्या दरम्यान शाहरूख खान आणि गौरी छिब्बरच्या प्रेमात पडला. गौरी पंजाबी आहे. तिच्या भावाला शाहरुख खान आजिबात आवडतं नव्हता.
-
२५ ऑक्टोबर १९९१ रोजी गौरी आणि शाहरुख खान लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर शाहरुखने त्याच्या करियरची सुरूवात केली. आर्यन खान,सुहाना खान आणि अबराम खान ही शाहरुख खानच्या मुलांची नावे आहेत.
-
आर्यन खानचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. आर्यनला मुंबई-गोवा क्रूझ ड्रग्ज केसमध्ये अटक केली आहे. या आधी अमिताभ बच्चन यांच्या नाती सोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत होत्या.
-
आर्यनला अभिनयात काही रस नाही. त्याला चित्रपट दिग्दर्शक बानायची इच्छा आहे. आर्यनने कैलिफोर्नियामधील USC School of Cinematic Arts मधून शिक्षण पूर्ण केले आहे.
-
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटो नेहमीच चर्चेत असतात. सुहाना Tisch School of the Arts युर्निव्हसिटी ड्रामा आणि अॅक्टिंगचे शिक्षण घेत आहे.
-
शाहरुख खानचा सर्वात छोटा मुलगा अबराम हा ८ वर्षांचा आहे.

WTC Points Table: सामना ड्रॉ होताच दोन्ही संघांना मोठा धक्का! सामन्यानंतर नेमकं काय घडलं?