-
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्र्ग्ज प्रकरणानंतर आमने-सामने आलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोपांमध्ये आज आणखीन एक भर पडली.
-
आज समीर वानखेडे यांचा धर्म आणि आधीचं लग्न या प्रकरणावरुन दिवसभर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील नव्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
-
‘पहचान कौन’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे.
-
जन्मदाखल्याचा फोटो शेअर केला असून इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी केला आहे.
-
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा एक फोटो ट्विट केला. वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केलाय.
-
“७ डिसेंबर २००६ साली लग्न झालं तेव्हा रिसेप्शन झालं. हा फोटो त्यादिवशीचा आहे. ज्यांना सोडचिठ्ठी दिली त्या पत्नीच्या फेसबुकवर हा फोटो आहे”. असं मलिक यांनी वानखेडेंचा जुन्या फोटोसंदर्भात बोलताना म्हटलंय.
-
दरम्यान समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असून आपण न्यायालयात उत्तर देऊन असं म्हटलं आहे.
-
“समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीम आहेत. आजदेखील आहेत आणि कालपण होते. एका मशिदीत जाऊन ते भाषण करत आहेत. एखाद्या मौलानापेक्षा जास्त धार्मिक विषय ते सांगत आहेत. नोकरीसाठी बोगस दाखला काढून त्यांनी नोकरी घेतली आहे. बोगसगिरीतून ते निर्माण झाले आहेत,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
-
“जी नवीन पत्नी आहे त्यांच्या कंपनीत कोणत्या बिल्डरची गुंतवणूक आहे. कोणत्या माध्यमातून हवाला रॅकेटने हे पेसे पाठवत आहेत ही माहिती आज ना उद्या लोकांसमोर येईल,” असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
-
“माझं नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे दाऊद नाही. हे कोणीतरी केले असेल किंवा लिहिले असेल, याच्याबद्दल माहिती नाही. पण माझे खरे नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे. माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला, पदवीचे प्रमाणपत्र, पत्नीने हिंदू पद्धतीने लग्न केल्याचे प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही प्रश्न कुठून उद्भवतात हे मला समजत नाही,” असे समीर वानखेडेंच्या वडिलांनी सांगितलं आहे.
-
मात्र असं असतानाच आता या प्रकरणावरुन समीवर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनेही पती समीर यांच्यासोबतच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत मलिक यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.
-
एकमेकांना वरमाला घालताना आणि नंतर आपल्या पालकांच्या साक्षीने मंदिरामध्ये विवाह करतानाचे दोन फोटो क्रांतीने पोस्ट केलेत.
-
या फोटोंना कॅप्शन देताना ती म्हणते, “मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही कोणत्याही धर्मामध्ये धर्मांतर केलेलं नाही.”
-
आम्हाला सर्व धर्मांचा सन्मान आहे. समीरचे वडीलही हिंदू असून त्यांनी मुस्लीम महिलेशी लग्न केलं होतं. माझ्या सासुबाई आज हयात नाहीत, असंही क्रांती म्हणालीय.
-
समीरचं आधीचं लग्न विशेष विवाह कायद्याअंतर्गत झालं होतं, असं क्रांतीनेच स्पष्ट केलं आहे.
-
समीर यांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतल्याचा उल्लेखही क्रांतीने केलाय.
-
आम्ही हिंदू विवाह कायद्यानुसार २०१७ साली लग्न केलं असल्याचं क्रांतीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
-
सध्या क्रांतीची ही पोस्ट फारच व्हायरल होताना दिसत आहे.
-
नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागल्यानंतर आता वानखेडेंनीही यावर स्पष्टीकरण दिलंय.
-
२००६ साली विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत समीवर वानखेडे यांनी नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केल्याचं स्पष्टीकरण मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना दिलं आहे.
-
२०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत समीर आणि शबाना या दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला., असंही समीर स्पष्टीकरणात म्हणाले आहेत.
-
२०१७ मध्ये समीर यांनी क्रांती रेडकरशी विवाह केल्याचंही म्हटलं आहे.
-
समीर वानखेडे यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगाही असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
-
क्रांती ही मराठी सिनेसृष्टीमधील नावाजलेली अभिनेत्री आहे.
-
आर्यन प्रकरणानंतर क्रांती अनेकदा समीर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं दिसून आलं आहे.
-
क्रांतीने समीर यांचं अनेकदा मुलाखींमधून कौतुक केल्याचंही पहायला मिळालं आहे.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल