-
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो.
-
चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते.
-
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत.
-
आपण आजवर मनोरंजन क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, काही साहित्य, तर काही विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार सोहळे पाहिले आहेत.
-
या सर्व पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकच गोष्ट ठराविक असते ती म्हणजे एखादी व्यक्ती व्यासपीठावर येऊन सीलबंद पाकीट फोडते आणि पुरस्कारच्या मानकऱ्याची घोषणा करते.
-
विजेत्यांची नावे सिलबंद पाकिटात शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवली जातात. पण ही सुरुवात कोणी केली असेल? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
-
विविध पुरस्कार सोहळ्यांमधील विजेत्यांचं नाव सिलबंद पाकिटात गुप्त ठेवण्याची सुरुवात ऑस्कर पुरस्कारानेच झाली आहे.
-
१९२९ साली पहिला ऑस्कर सोहळा साजरा केला गेला. त्यावेळी सर्व विजेत्यांची नावं तीन महिने आधीच जाहीर करण्यात आली होती.
-
विजेत्यांची नावं आधीच माहिती असल्याने पहिल्या ऑस्करबाबत कुणीच फारसे उत्साही नव्हते. यावर त्यावेळीचे प्रसिद्ध दिग्दर्शक सेड्रिक गिब्ज यांनी एक उपाय सुचवला.
-
एखाद्या विजेत्याचे नाव थेट जाहीर करण्यापेक्षा त्या क्षेत्रातील पाच संभाव्य विजेत्यांची नावं जाहीर करायची. या प्रकाराला आपण आज नामांकन असे ओळखतो.
-
या पाचही नामांकित स्पर्धकांची जाहिरात करायची आणि पुरस्कार दिनादिवशी यातील एका विजेत्याचं नाव जाहीर करायचं, अशी कल्पना त्यांनी मांडली.
-
त्यांनी मांडलेली ही कल्पना ऑस्कर समितीतील सर्व सभासदांना आवडली.
-
त्यावेळी वृत्तमाध्यमांना आदल्या दिवशी रात्री ११ वाजता विजेत्यांच्या नावांची यादी दिली जायची.
-
यामुळे पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी त्यांची जाहिरातही होत असे आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांमध्ये पुरस्काराबाबत उत्साह देखील कायमच असायचा.
-
पण १९४१ साली यात थोडासा बदल करण्यात आला. ऑस्कर समितीने आदल्या दिवशी वृत्तमाध्यमांना विजेत्यांची नावं देणं थांबवलं.
-
त्यांनी सिलबंद पाकिटात नावं गुप्त ठेवण्याचा प्रयोग सुरु केला आणि हे पाकिट व्यासपीठावरच फोडले जाईल याची काळजी घेतली.
-
हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांना प्रचंड आवडला. यामुळे प्रेक्षक, कलाकार आणि वृत्तमाध्यमही देखील चकित झाली.
-
त्यानंतरच ऑस्करबाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला.
-
तेव्हापासून आजपर्यंत ऑस्कर विजेत्यांची नावं सिलबंद पाकिटात शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवली जातात. (सर्व फोटो- pixabay)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?