-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या मालिकेत नेहाची भूमिका साकारत आहे.
-
प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रार्थना चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
‘New Me’ असं कॅप्शन देत प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
प्रार्थनाच्या या ग्लॅमरस लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.
-
प्रार्थनाचे हे फोटो बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देत आहेत.
-
प्रार्थनाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी चित्रपटातून प्रार्थनाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
-
त्यानंतर ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मि. अॅण्ड मिसेस् सदाचारी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये प्रार्थनाने काम केले आहे.
-
‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतही प्रार्थनाने काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे / इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल