-
गुल्लक सीजन ३ : या वेबसीरिजच्या पहिल्या दोन सीजन्सना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सीरिजमध्ये मध्यमवर्गीय भारतीयांची स्वप्ने आणि इच्छा या सीरिजमधून अगदी उत्तमरित्या मांडल्या आहेत.
-
ही मालिका मिश्रा कुटुंबाभोवती फिरते, ज्यामध्ये अनेक पात्रांचा समावेश आहे जे या प्रक्रियेत एकमेकांना मदत करताना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
-
तिसरा सीझन आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबातील मोठ्या मुलाभोवती फिरताना दिसतो.
-
अभय सीजन ३ : या थ्रिलर फ्रँचायझीच्या तिसऱ्या सीझनमध्ये कुणाल खेमू अभय प्रताप सिंगच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या सीजनमध्ये, गुन्हा करून मागे क्लू सोडणाऱ्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी तो तयार आहे.
-
पहिल्या दोन सीझनप्रमाणेच हा देखील एक एज-ऑफ-द-सीट थ्रिलर आहे जो तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.
-
माई : साक्षी तन्वर एका सूड घेणाऱ्या आईची भूमिका साकारत आहे जी आपल्या मुलीच्या अपघाचा शोध घेण्यासाठी निघते.
-
या थ्रिलर तसेच भावनिक चित्रपटात साक्षी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी शक्तिशाली राजकारणी, नोकरशहा आणि पोलिसांशी सामना करताना दिसते.
-
दसवी : या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्यमंत्री गंगाराम चौधरी यांची भूमिका साकारत आहे, ज्यांना तपासाअंती न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
तुरुंगात घालवलेल्या काळात, गंगाराम दहावीचा अभ्यास पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतात.
-
निम्रत कौर त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तिला गंगाराम तुरुंगात असताना त्याचे कार्यालय ताब्यात घेण्यास भाग पाडले जाते.
-
यामी गौतम या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून शिक्षणाभोवती फिरणारा हा एक विनोदी चित्रपट असल्याचे दिसून येते.
-
जर्सी : करोना महामारीमुळे सतत पुढे ढकलण्यात आलेला ‘जर्सी’ का क्रिकेटवर आधारित चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे.
-
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका पित्यावर केंद्रित आहे.
-
जो आपल्या मुलासाठी पुन्हा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतो.
-
तथापि, यामुळे त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक गुंतागुंत निर्माण होतात.
-
रनवे ३४ : वास्तविक जीवनातील परिस्थितीवर आधारित, या चित्रपटात अजय देवगन एका प्रतिष्ठित वैमानिकाची भूमिका साकारत आहे, ज्याला विमानाचे आपत्कालीन लँडिंग केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.
-
रकुल प्रीत सिंग त्याच्या सह-वैमानिकाची भूमिका साकारत आहे जी त्याच्यासोबत गंभीर परिस्थितीचा सामना करते.
-
दुसरीकडे, अमिताभ बच्चन एका अधिकाऱ्याची भूमिका साकारतात ज्याला या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दिली जाते.
-
ट्रेलरवरून असे दिसते की ही देवगन आणि बच्चन यांच्या पात्रांमधील बुद्धीची लढाई आहे.
-
(सर्व फोटो : इंस्टाग्राम)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली