-
करण जोहर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे. करण जोहरने केवळ अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले नाही तर अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. (photo: @karanjohar/ instagram)
-
एक काळ असा होता की करण जोहरच्या चित्रपटांची नावेही क अक्षराने सुरू व्हायची. हे असे वर्षानुवर्षे चालले. पण आता तसे होत नाही. कारण काही कारणास्तव करण जोहर त्याच्या चित्रपटांचे शीर्षक बदलू लागला. (photo: @karanjohar/ instagram)
-
‘कुछ कुछ होता है’ हा करण जोहरचा दिग्दर्शनातील पदार्पण होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. (photo: indian express)
-
कुछ कुछ होता है नंतर त्यांनी कल हो ना हो, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, काल आणि कुर्बान सारखे चित्रपट केले. या सर्व चित्रपटांची नावे क या अक्षराने सुरू होतात. (photo: indian express)
-
करण जोहरने ‘क’ हे अक्षर स्वत:साठी लकी मानले होते, त्यामुळेच त्याच्या चित्रपटांची नावेही याच अक्षराने ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली होती.
-
मात्र अनेक वर्षे चालल्यानंतर हे चक्र खंडित झाले. करण जोहरने इतर अक्षरांसह चित्रपटांची नावे ठेवण्यास सुरुवात केली.
-
करण जोहरने एका मुलाखतीत सांगितले होते की, संजय दत्तच्या आगामी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात नन्यूमरॉलॉजी वर टीका करण्यात आली होती.
-
या संकल्पनेतील फोलपणा लक्षात आल्यावर ‘k’ प्रकरणाचा नाद सोडला आणि त्याच्या सिनेमाचे शीर्षक बदलू लागले.
-
करण जोहरने सांगितले की, आधी त्याला वाटले होते की, जर त्याने चित्रपटाचे नाव K हे अक्षर ठेवले नाही तर चित्रपट फ्लॉप होईल. पण ते तसे नाही. आता तो त्याच्या चित्रपटांची नावे कोणत्याही अक्षराने ठेवतो. (photo: indian express)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली