-
बहुचर्चित ‘आश्रम ३’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
पहिल्या दोन सीझनप्रमाणेच या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
-
‘एक बदनाम…आश्रम’ या तिसऱ्या पर्वाची निर्मिती आणि दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे.
-
कपट-कारस्थानं, हिंसा, दादागिरी, विश्वासघात, हत्याकांड आणि तद्दन मसाल्याने भरलेली ही वेब सीरिज सर्वाधिक ट्रेण्डिंग राहिली आहे.
-
‘आश्रम ३’ वेब सीरिज सध्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे.
-
या वेब सीरिजप्रमाणेच त्यातील कलाकारांचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे.
-
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल वेब सीरिजमध्ये ‘बाबा निराला’ मुख्य भूमिकेत आहे.
-
अभिनेत्री परिणीता सेठने ‘आश्रम ३’मध्ये साध्वी माताची भूमिका साकारली आहे.
-
वेब सीरिजमध्ये साध्वी माता बाबा निरालाच्या कारस्थानांत त्याला पुरेपूर साथ देताना दिसते.
-
‘आश्रम ३’मध्ये साडीत अगदी साधी दिसणारी साध्वी माता खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे.
-
परिणीता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
अनेक फोटो ती इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते.
-
छोट्या पडद्यावरील ‘सीआयडी’ सोबत अनेक मालिकांमध्ये परिणीता दिसली होती.
-
मालिकांप्रमाणेच परिणीताने अनेक वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत ‘हम तुम’ या चित्रपटातदेखील ती झळकली होती. (सर्व फोटो : परिणीता सेठ /इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल