-
छोट्या पडद्यावरील मराठमोळा कलाकार सिद्धार्थ बोडकेने अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
-
अल्पावधीतच सिद्धार्थने दमदार अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
-
२०१५ साली ‘टाईम बरं वाईट’ या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
-
त्यानंतर ‘भय’, ‘नेबर्स’ या चित्रपटांतही सिद्धार्थ झळकला.
-
झी युवावरील ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेमुळे सिद्धार्थ प्रसिद्धीझोतात आला.
-
या मालिकेत त्याने मुख्य नायिकाची भूमिका साकारली होती.
-
‘नकुशी तरी हवीहवीशी’, ‘असे हे कन्यादान’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांत सिद्धार्थने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.
-
आता सिद्धार्थ लवकरच हिंदी चित्रपटातही झळकणार आहे.
-
‘दृश्यम २’ या चित्रपटातून सिद्धार्थ बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे.
-
सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
-
सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
सध्या सिद्धार्थ स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत खलनायिकाची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (सर्व फोटो : सिद्धार्थ बोडके/ इन्स्टाग्राम)

“घरच्यांना वाटतं मुलगी कमवतेय पण ती…”, VIDEO पाहून कळेल मुलींच्या आयुष्यातला संघर्ष