-
अभिनेता देवदत्त नागे ‘जय मल्हार’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत सर्वांच्या घराघरात पोहोचला.
-
मराठी मनोरंजन सृष्टीत लोकप्रियता मिळवल्यावर हिंदी मनोरंजन सृष्टीतही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली.
-
अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्याबरोबर तो ‘तान्हाजी’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसला.
-
तर आता तो ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.
-
देवदत्त ‘आदिपुरुष’ या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
गेले अनेक महिने प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.
-
या बिग बजेट चित्रपटात तो महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याने सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.
-
अशातच एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने देवदत्तसाठी एक खास पोस्ट लिहित तो तिचा भाचा असल्याचं सांगितलं.
-
ही अभिनेत्री म्हणजे वीणा जामकर आहे.
-
मराठी सिनेसृष्टीत गेली अनेक वर्षं काम करत उत्तमोत्तम भूमिका साकारणारी चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून वीणा जामकरला ओळखतात.
-
“देवदत्त नागे माझा वैयक्तिक आयुष्यात भाचा आहे आणि मी त्याची मावशी..पण त्याला मी पहिल्यांदा भेटले होते ‘जय मल्हार’ च्या सेटवर.. कुठल्या ना कुठल्या कौटुंबिक कारणामुळे आम्ही जन्मापासून आजपर्यंत फार भेटलोच नाही,” असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
-
त्या दोघांमध्ये नातं आहे हे कोणालाच त्यापूर्वी माहीत नसल्याने सर्वजण त्यांच्या नात्याबद्दल कळल्यावर आश्चर्यचकित झाले.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”