-
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट आज १६ जून रोजी प्रदर्शित झाला.
-
चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
आदिपुरुषमध्ये श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासला मराठी अभिनेता शरद केळकर यांनी आवाज दिला आहे.
-
बाहूबलीमध्येही प्रभासच्या पात्राला शरद केळकरांनी आपला दमदार आवाज दिला होता.
-
हिंदी चित्रपट नानीसाठीही शरद केळकर यांनीही आपला आवाज दिला आहे.
-
पण एक काळ असा होता की शरद केळकर यांना बोलण्याचा त्रास होता.
-
त्यांना नीट बोलता येत नव्हतं
-
त्यांना तोतरेपणाचा त्रास होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नेहमी कमी असायचा.
-
वाक्य तर सोडाच पण एक शब्दही त्यांना नीट बोलता येत नव्हत.
-
तोतरेपणामुळे त्यांना आपला रागही व्यक्त करता येत नव्हता.
-
कारण राग व्यक्त करतानाही हे तोतर बोलायचे
-
पण नंतर केळकर यांनी आपल्या बोलण्याच्या त्रासकडे लक्ष दिले आणि त्यावर बरेच काम केले.
-
आपल्या आवाजावर मेहनत घेऊन शरद केळकर आज आवाजाचे बादशाह बनले आहेत.
-
त्यानंतर आज शरद केळकर अशा लोकांसाठी प्रेरणा बनले आहेत, ज्यांना बोलण्यात अडचण येते.
-
फोटो (लोकसत्ता, जनसत्ता)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल