-
मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवेने ठाण्यात नवीन घर खरेदी केलं आहे.
-
ऋतुजाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवं घर घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली.
-
‘मी ठाणेकर’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची झलक सर्वांना दाखवली.
-
पारंपरिक पद्धतीने आई-वडिलांसह पूजा करून अभिनेत्रीने नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
गृहप्रवेशासाठी अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
अभिनेत्रीच्या नव्या घराच्या खिडकीतून सुंदर व्ह्यू आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे.
-
नव्या घरासाठी अभिनेत्रीने हटके नेमप्लेट बनवून घेतली आहे. पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवलेल्या नेमप्लेटवर ‘ऋतुजा प्रतिभा राजन बागवे’ असं पूर्ण नाव लिहिलेलं आहे.
-
ऋतुजाच्या घरातील एका भिंतीवर मोठ्या अक्षरांमध्ये विठ्ठलाचं नावं लिहिलेलं आहे. या ठिकाणी अभिनेत्रीच्या आई-बाबांनी कमरेवर हात ठेवून फोटो काढला आहे.
-
दरम्यान, ऋतुजाच्या आनंदात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सहभागी झाले होते. या सर्वांबरोबरचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस