-
‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या वर्षभरापासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे.
-
रंजक कथानकामुळे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळवली.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेचं संपूर्ण कथानक सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज व मधूभाऊंच्या केसभोवती फिरतं.
-
‘ठरलं तर मग’ने टीआरपीत अव्वल स्थान राखण्याचं संपूर्ण श्रेय या मालिकेच्या कलाकारांबरोबरच लेखिकेचंही आहे.
-
यामध्ये अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली प्रमुख भूमिकेत आहेत.
-
याशिवाय केतकी पालव, प्रियांका दिघे, प्रिया तेंडोलकर, सागर तळाशीकर, ज्योती चांदेकर या कलाकारांनी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेचा प्रमुख आधारस्तंभ आहे याची अनोखी कथा.
-
मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. त्यामुळे ‘ठरलं तर मग’ची लेखिका आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
या मालिकेचं लेखन ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने केलं आहे.
-
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात एकूण सहा अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्याने यातील नेमकी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.
-
परंतु, या सहा जणींमध्ये अभिनेत्री शिल्पा नवलकर या उत्तम लेखिका आहे.
-
गेल्या वर्षभरापासून शिल्पा नवलकर, सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या कथेचं अर्थात ‘ठरलं तर मग’चं लेखन करत आहेत.
-
याशिवाय त्यांनी मालिकेत प्रतिमा ही महत्त्वपूर्ण भूमिका देखील साकारली आहे.
-
सायली-अर्जुनप्रमाणे प्रेक्षकांना प्रतिमा सुद्धा प्रचंड आवडते.
-
दरम्यान, शिल्पा नवलकर यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचं लेखन केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी )

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक