-
लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या दमदार अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे जास्त ओळखला जातो.
-
अभिनेत्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
-
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेला सिद्धार्थ ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकणार आहे.
-
बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर २’ चित्रपटातील एका गाण्यात सिद्धार्थ जाधव पाहायला मिळणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी अभिनेता ‘धर्मवीर २’ चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरण करताना दिसला होता.
-
‘धर्मवीर २’ चित्रपटातील या गाण्याच्या चित्रीकरणाचा व्हिडीओ अभिनेते, निर्माते मंगेश देसाईंनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्यामुळे ‘धर्मवीर २’ चित्रपटातील एका गाण्यात सिद्धार्थ झळकणार असल्याचं समोर आलं होतं.
-
याशिवाय सिद्धार्थने देखील इन्स्टाग्रामवर गाण्याच्या चित्रीकरणाचे फोटो शेअर केले आहेत. माहितीनुसार, ‘धर्मवीर २’ चित्रपटातील या गाण्यात सिद्धार्थबरोबर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी असल्याचं म्हटलं जात आहे.
-
‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पार पडला होता. त्यामुळे आता चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – सिद्धार्थ जाधव इन्स्टाग्राम)

पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे