-
‘एजंट विनोद’, ‘वो मैं नहीं’, ‘प्रियतमा’, ‘हिफाजत’, ‘द बर्निंग ट्रेन’ व ‘एक ही रास्ता’ या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सचदेव यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता.
-
मुंबईत जन्मलेल्या अभिनेत्री आशाचे पहिले नाव नफिसा सुलतान होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब हे चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहे. आशाचे वडील आशिक हुसैन वारसी हे लेखक व उत्कृष्ट कवी होते; तर त्यांची आई रझिया यांनीही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
लेखक आशिक आणि रझिया यांना तीन मुले होती. मात्र, १९६० नंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अभिनेत्री आशा आणि त्यांची छोटी बहीण आपल्या आई रझियासोबत राहू लागल्या; तर भाऊ अन्वर त्यांच्या वडिलांसोबत राहू लागला.
-
काही काळानंतर आशा यांच्या आई रझिया यांनी मुंबईचे प्रसिद्ध वकील आय. पी. सचदेव यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यानंतर त्यांचे नाव नफिसा बदलून आशा, असे ठेवण्यात आले.
-
त्याच वेळी आशा यांच्या वडिलांनीदेखील दुसरे लग्न केले. त्यानंतर अर्शद वारसी यांचा जन्म झाला. अशा प्रकारे अभिनेत्री आशा सचदेव आणि अर्शद वारसी हे सावत्र भाऊ-बहीण आहेत.
-
अभिनेत्री आशा सचदेव यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली.
-
उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री आशा सचदेव यांना बॉलीवूडमधील अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
-
ज्येष्ठ अभिनेत्री आशा यांनी त्यांच्या ३५ वर्षांच्या करिअरमध्ये ९० हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
-
अभिनेत्री आशा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांचे लग्न किशनलाल नावाच्या एका वकिलासोबत ठरले होते.
-
किशन आणि अभिनेत्री आशा यांच्या लग्नाच्या काही दिवसांपूर्वी किशनलाल यांचा कार अपघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर आशा सचदेव यांनी कोणाशीही लग्न केले नाही.
-
(सर्व फोटो क्रेडिट्स : इंडियन एक्सप्रेस)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”