-
एकता कपूरच्या सुपरहिट शो ‘ये है मोहब्बतें’मध्ये ‘रुही’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती भाटियाने नुकतंच मुंबईत घरी घेतलं आहे.
-
आदितीने आपल्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आदिती भाटियाने गृहप्रवेश व पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपरिक पद्धतीने पूजा करताना दिसत आहे.
-
याशिवाय अभिनेत्रीने व्हिडिओ कॉलद्वारे तिच्या आजीलाही या पूजेत सामील केले आहे.
-
अदितीने नुकतीच नवीन मर्सिडीज कार देखील खरेदी केली होती आणि आता अभिनेत्रीने तिच्या स्वप्नातील घर विकत घेतले आहे. या सर्व यशाचे श्रेय आदितीने तिच्या आईला दिले आहे.
-
अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरीजवर काही फोटोही शेअर केले आहेत, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “आज मी जे काही आहे हे सगळं फक्त माझ्या आईमुळे आहे. मी अनावश्यकपणे खूप पैसे खर्च करते, परंतु माझी आई सर्वकाही सांभाळते. म्हणूनच मी तिची आभार मानते.”
-
अभिनयासह अदिती सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर देखील आहे.
-
(फोटो : आदिती भाटिया /इन्स्टाग्रामवर)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा