-
नुकताच ‘खेल खेल में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकार दिसणार आहेत. जाणून घेऊया चित्रपटातील कलाकारांना किती मानधन मिळाले आहे.
-
अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्याने ६० कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.
-
‘खेल खेल में’ चित्रपटात काम करण्यासाठी वाणी कपूरने १.५ कोटी रुपये घेतले आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार पंजाबी गायक एमी विर्क देखील या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने १.५ कोटी रुपये घेतले आहेत.
-
या चित्रपटासाठी अभिनेत्री तापसी पन्नूला एक कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
-
१४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणारा अभिनेता फरदीन खानला या चित्रपटासाठी ७० लाख रुपये देण्यात आले आहेत.
-
प्रज्ञा जयस्वालने ‘खेल खेल में’ चित्रपटात काम करण्यासाठी ५५ लाख रुपयांचे मानधन घेतले आहे.
-
आदित्य सीलने या चित्रपटासाठी ४० लाख रुपये घेतले आहेत.

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?