-
पतीच्या दीर्घायुष्यासाठी ‘करवा चौथ’ हा सण साजरा केला जातो.
-
दरवर्षी, सगळ्या बॉलीवूड अभिनेत्री मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. यंदा कतरिना कैफने ‘करवा चौथ’ निमित्त शेअर केलेल्या सगळ्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
सणानिमित्त अभिनेत्रीने खास गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
-
पारंपरिक साज करून कतरिनाने हा सण साजरा केला. भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र या लूकमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत होती.
-
कतरिनाने शेअर केलेले फोटो पाहून नेटकरी सासू-सुनेत असलेल्या सुंदर अशा बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत.
-
कतरिना यातील एका फोटोत सासूबाईंचा आशीर्वाद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
विकी कौशलने या फोटोंवर “माझं संपूर्ण जग” अशी कमेंट केली आहे.
-
कतरिनाच्या गळ्यातील मंगळसूत्राने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काळे मणी अन् डायमंडची डिझाइन असलेलं अभिनेत्रीचं मंगळसूत्र सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे.
-
नेटकऱ्यांनी कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी “विकी खूपच लकी आहे” अशा कमेंट्स देखील या फोटोंवर केल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : कतरिना कैफ इन्स्टाग्राम )

Today Horoscope live updates: शनीच्या साडेसातीपासून ५ राशींना मिळणार सुटका, कोणाला बक्कळ धनलाभ तर कोणाच्या कुंडलीत मोठे बदल; वाचा राशिभविष्य