-
प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.
-
आता कामातून वेळ काढून अभिनेत्री तिच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली आहे.
-
प्राजक्ताबरोबर यावेळी तिची लहान भाची देखील आहे. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
प्राजक्ता माळीने गेल्यावर्षी हे आलिशान फार्महाऊस खरेदी केलं.
-
वीकेंडचा आनंद घेण्यासाठी आणि मुंबईपासून काहीसं दूर कर्जत येथे प्राजक्ताचं हे फार्महाऊस आहे.
-
नुकतीच अभिनेत्री आपल्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढून फार्महाऊसला गेली आहे. याचे फोटो शेअर करत प्राजक्ताने सुंदर असं कॅप्शन दिलं आहे.
-
प्राजक्ताच्या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ आहे. या घराला ती ‘दुसरं लाडकं घर’ असंही म्हणते.
-
“मी प्राजक्तकुंज या माझ्या घराला वचन दिलंय की, प्रत्येक प्रोजेक्टनंतर शीण घालवायला इथेच येणार…” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
प्राजक्ताचे हे सुंदर फोटो पाहून अमृता खानविलकरने यावर ‘प्रेम’ अशी कमेंट केली आहे. तर, “मी कधी यायचंय तिकडे” असा प्रश्न अभिनेत्री ऋतुजा बागवेने प्राजक्ताला कमेंटमध्ये विचारलाय. प्राजक्ताने सुद्धा तिला, “तू फक्त तारखा सांग…” असा रिप्लाय तिला दिला आहे. ( फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम )

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल