-
बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. विकी कौशलचा जन्म १६ मे १९८८ साली एका पंजाबी कुटुंबात झाला.
-
अभिनेत्याने ‘मसान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले.
-
अभिनेता म्हणून काम करण्याआधी विकी कौशलने काही चित्रपटांचे असिस्टंट डायरेक्टर म्हणूनदेखील काम केले आहे. यामध्ये ‘गँग्स ऑफ वासेपुर’चे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
-
‘उरी:द सर्जीकल स्ट्राइक’, ‘राझी’,’सरदार उधम’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘संजू’, ‘सॅम बहादुर’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘डंकी’ ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील अभिनेत्याच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.
-
या सगळ्यात विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट चांगलाच गाजला.
-
छावा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. छावा चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता.
-
छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटातील विकी कौशलने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांपासून ते दिग्गज कलाकारांनी कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
-
आता लवकरच अभिनेता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळींच्या लव्ह अँड वॉरमध्ये तो महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याबरोबर आलिया भट्ट व रणबीर कपूरदेखील प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.
-
याबरोबरच, विकी कौशल ‘तख्त’ या चित्रपटातदेखील दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. (सर्व फोटो सौजन्य: विकी कौशल इन्स्टाग्राम)

Mumbai Metro: मुंबईतील नव्या मेट्रो स्थानकात किळसवाणं कृत्य; व्हायरल VIDEO वर मुंबईकरांचा संताप