-
अभिनेत्री प्राप्ती रेडकरने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
अभिनयाबरोबरच ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील अनेकदा चर्चेत असते.
-
नुकतेच तीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे.
-
केसात गजरा, नाकात नथ, साडी, हातात बांगड्या या वेशभूषेत अभिनेत्री अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
तिच्या या फोटोंवर मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
प्राप्तीची प्रमुख भूमिका असलेली ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे.
-
या मालिकेत प्राप्ती रेडकरने सावली ही भूमिका साकारली आहे.
-
सारंग व सावली यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
सध्या मालिकेत आषाढी एकादशी वारीचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे. सारंग सावलीच्या आई-वडिलांची वारी खांद्यावर कावड घेऊन पूर्ण करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे. (फोटो सौजन्य: प्राप्ती रेडकर इन्स्टाग्राम)

BJP New Woman President : भाजपाला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? निर्मला सीतारमण यांच्यासह ‘ही’ दोन नावे शर्यतीत