-
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. मृणालनं ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मनं बावरे’सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
मालिकांमधून प्रेक्षकांसमोर हटके लव्हस्टोरीज घेऊन येणाऱ्या मृणालच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाची गोष्टसुद्धा सारखीच आहे. अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज आहे.
-
पण मृणालच्या लग्नाची गोष्ट एखाद्या फिल्मी लव्हस्टोरीपेक्षा काही कमी नाही. मृणालनं अरेंज मॅरेज करत नीरज मोरेबरोबर लग्नगाठ बांधली. आता त्या दोघांना एक लहान मुलगीही आहे.
-
नीरज परदेशात असल्यानं तेव्हा दोघे मोबाईलद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहायचेच; पण ते एकमेकांना पत्रदेखील लिहायचे आणि याच पत्राचा एक खास किस्सा आहे.
-
याबद्दल मृणालनं अनुरूप विवाहसंस्था या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत “मला आणि नीरजला एकमेकांचं अक्षरं बघायचं होतं. त्यामुळे आम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं? हे त्यावर लिहिलं आणि त्याचे फोटो शेअर केले” असं सांगितलं होतं.
-
यानंतर मृणाल सांगते, “मला घरात बाबा किंवा भावाचे कपडे घालायची सवयच आहे. तर एकदा मी बाबांचं शर्ट घातलं आणि नीरजला लिहिलेली चिठ्ठी बाबांच्या शर्टच्या खिशात राहिली. नंतर बाबांना ती चिठ्ठी मिळाली”
-
यापुढे मृणालनं सांगितलं की, “नीरजला लिहिलेली ती चिठ्ठी बाबांनी वाचली आणि तेव्हाच बाबांना कळलं की, आम्ही आता प्रेमात पडलो आहोत. मग त्याचदिवशी मी आई-बाबांना नीरजबरोबर लग्न करायला तयार असल्याचं सांगितलं.”
-
दरम्यान, मृणाल सध्या स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
ICCने हारिस रौफवर घातली दोन सामन्यांची बंदी, सूर्या-बुमराहवरही कारवाई; IND vs PAK सामन्यांमधील वादावर उचललं मोठं पाऊल