-
हिवाळ्यात ब्रोकलीचे सेवन कारणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी यासारखे पोषक तत्त्वे असतात.
-
ब्रोकली ही अशी भाजी आहे ज्यामुळे कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, अस्थमा यासारख्या गंभीर आजारांपासूनही आपला बचाव होऊ शकतो. आज आपण हिवाळ्यात ब्रोकली खाण्याचे फायदे जाणून घेऊया.
-
ब्रोकलीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. यामुळे आपले पोत भरलेले राहते आणि याच कारणामुळे आपण काही काळातच वजन कमी करू शकतो.
-
ब्रोकोली यकृतासाठीही खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. ब्रोकोलीचे सेवन यकृताशी संबंधित समस्यांपासून आराम देण्याचे काम करते.
-
ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. याच्या सेवनाने हाडांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
-
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हंगामी आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
-
आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा बोक्रोली या भाजीचे सेवन केल्यास टाइप-टू मधुमेह, हृदयविकार, अस्थमा आणि कर्करोग यावर आळा घालता येतो, असे संशोधन अमेरिकी संशोधकांनी केले आहे.
-
मूर फॅमिली सेंटरच्या इमिली हो यांनी ब्रोकोलीमध्ये असलेले ‘रिबॉन्सेलिक अॅसिड’ आरएनए रेणुंवर प्रभाव पाडत असल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होत असल्याचे म्हटले आहे. काही पदार्थ आणि व्यसनांमुळे कर्करोगाला निमंत्रण मिळत असते. मात्र, ब्रोकोलीमुळे त्यावर नियंत्रण शक्य असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
-
कर्करोगाची प्रक्रिया संथ असल्यामुळे ब्रोकोलीचा विशेष प्रभाव त्यावर पडतो. कर्करोगाच्या पेशी कमी करण्यात या भाजीचा मोलाचा वाटा असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.
-
आहारात जर ब्रोकोलीचा समावेश असेल तर यकृताच्या कर्करोगापासून संरक्षणाबरोबरच यकृताची चरबीयुक्त अतिरिक्त वाढही रोखण्यास मदत होत असल्याचा दावा नव्या संशोधनानंतर केला गेला आहे.
-
संशोधकांच्या मते, आठवड्यातून तीन ते चार वेळा ब्रोकोलीचे सेवन केल्यास स्तनाचा, प्रोस्टेट आणि मोठ्या आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता फारच कमी असते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Pexels)

आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्या राशींच्या कानी पडणार शुभवार्ता? वाचा मेष ते मीनचे सोमवार विशेष राशिभविष्य