-
साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. तुम्ही अनेकदा निरीक्षण केले असेल की साप सारखे जीभ बाहेर काढतात. (Photo : Freepik)
-
अनेकांना सापाचे वारंवार जीभ बाहेर काढणे भीतीदायक वाटू शकते. पण, तुम्ही कधी विचार केला का साप वारंवार जीभ बाहेर का काढतात? (Photo : Freepik)
-
आपल्याला अनेकदा वाटतं की साप आपल्याला भीती दाखवण्यासाठी जीभ बाहेर काढतात, पण त्यामागे अनेक कारणे आहेत. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Photo : Freepik)
-
लाइव्ह सायन्सच्या एका वृत्तात सांगितल्याप्रमाणे, वातावरणातील हवेची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी साप वारंवार जीभ बाहेर काढतात. हे खूप कमी लोकांना माहिती असते की, सापाचे डोळे कमजोर असतात आणि त्यांना नीट ऐकू येत नाही; पण त्यांच्यात परिसरातील गंध समजून घेण्याची क्षमता चांगली असते. (Photo : Freepik)
-
सापाला जरी नाकपुड्या असल्या, तरी ते जीभ बाहेर काढून शिकारीचा गंध घेण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय साप त्यांच्या जिभेचा वापर करून शिकार किंवा भक्षकांचासुद्धा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे साप अत्यंत चपळाईने शिकार पकडण्यासाठी आपल्या जिभेचा वापर करताना दिसतात. (Photo : Freepik)
-
जेव्हा साप जीभ बाहेर काढतात, त्यावेळी ते वातावरणातील सूक्ष्म कणांमध्ये असलेला गंध जिभेवर एकत्रित करतात आणि त्यानंतर ते जिभेला जॅकबसन नावाच्या त्यांच्या अवयवात टाकतात. (Photo : Freepik)
-
हा अवयव सापाच्या तोंडाच्या वरच्या भागाला स्थित असतो. सापाची जीभ या अवयवात व्यवस्थित बसते. याच्याच मदतीने ते वातावरणातील तापमान आणि कंपनाचा अंदाज घेतात. (Photo : Freepik)
-
साप जेव्हा जिभेवरील सूक्ष्म कण जॅकबसन या अवयवात टाकतो, तेव्हा त्यात असलेले केमिकल या कणांमध्ये एकत्रित होतात. हे रिसेप्टर्स सापाच्या मेंदूला जाऊन सांगतात की हा गंध नेमका कशाचा आहे. सापाशिवाय जॅकबसन नावाचा हा अवयव पालीच्या अनेक प्रजातींमध्ये आढळतो. (Photo : Freepik)
-
आता जर या पुढे तुम्हाला साप सारखे जीभ बाहेर काढताना दिसले तर घाबरू नका. वारंवार जीभ बाहेर काढणे हा सापाच्या दैनंदिन जैविक प्रकियेचा भाग आहे. (Photo : Freepik)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान