-
ऑफिस, तिथलं कामाचं वाढतं स्वरुप, रोजच्या रोज येणारे ताण या सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमीच्याच असतात. पण तरीही कधी कधी सवय असूनही या गोष्टींचा अत्याधिक येतो. (फोटो : Freepik)
-
अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम करणं आदी सर्व गोष्टी आणि बिघडलेल्या जीवनशैलीचे थेट परिणाम शरीरावर होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो : Freepik)
-
तसेच ९ ते १२ तासांच्या शिफ्टनंतर व्यायामशाळेत जाणं अनेकांसाठीच आव्हान असतं. परिणामी, अरे पोट सुटलंय, पाठ दुखतेय, अंगदुखी आहे… अशा अनेक समस्या घेऊन आपल्यापैकी अनेकांचं दररोजचं रडगाणं सुरूच असतं. (फोटो : Freepik)
-
ऑफिसमध्ये थोडा वेळ काढून व्यायाम केल्यानं डायबिटीजचा धोका कमी होतो, असं निरीक्षण एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. (फोटो : Freepik)
-
ऑफिसच्या वेळेत चालणे किंवा सामूहिक व्यायाम केल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी तीन महिन्यांत सामान्य (नॉर्मल) झाल्याचं यातून समोर आलं आहे.(फोटो : Freepik)
-
डायबिटीज स्पेशॅलिस्ट डॉ. व्ही. मोहन यांच्या मते, आहारामध्ये पौष्टिक अन्नाचा समावेश केला पाहिजे. कामाच्या ठिकाणी कॅन्टीनमध्ये अन्ननिवडीला, तसेच शारीरिक हालचालींवर जोर दिला पाहिजे. (फोटो : Freepik)
-
दररोज फक्त चालल्याने उच्च रक्तदाब १५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. ते पुढे म्हणाले. “हा अभ्यास आता भारतीय कंपन्यांसाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक व फायदेशीर ठरू शकतो. (फोटो : Freepik)
-
डॉ. मोहन यांच्या मते, भारतात १०१ दशलक्ष लोक डायबिटीज आणि ३१५ दशलक्ष लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. (फोटो : Freepik)
-
जेव्हा वजन नियंत्रणात असते तेव्हा डायबिटीजचा धोका साडेचार पटींनी कमी होतो. कामाच्या ठिकाणी थोडासा ब्रेक घेऊन चालणं खूप फायदेशीर ठरू शकतं. (फोटो : Freepik)

“आता काय जीवच घेणार का?” महिलेला अंड्यात सापडलं पाहा; VIDEO पाहून यापुढे अंडी खाताना शंभर वेळा विचार कराल