-
आपल्या आहारांमध्ये अनेकदा कांद्याचे समावेश असते आणि यामुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे देखील होतात.
-
जाणून घेऊया कांद्यापासून होणाऱ्या आरोग्य फायद्यांबद्दल.
-
कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे कांद्याचे सेवन तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम फायदेशीर आहे. इतकेच नाही तर कांदा अत्यंत पौष्टिक असल्यामुळे आपल्याला मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगाच्या धोक्या पासून वाचवते.
-
कांद्याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या अनेक अँटिऑक्सिडंट तयार होतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
-
तुम्हाला मधुमेह असल्यास, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही कांद्याचे सेवन करू शकता. कांद्यामधील ‘फ्लेव्होनॉइड्स’ रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत करते.
-
कांद्यामध्ये प्रीबायोटिक्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ही संयुगे शरीरातील पचनास मदत करून, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात.
-
कांद्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात हे सल्फर, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्ससह उपयुक्त असते.
-
तज्ञांच्या मते कांद्याचे सेवन केल्याने कोलोरेक्टल आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. (Photos: Unsplash)

“ती यादी लपवण्यात छुपा राजकीय हेतू?” मविआ व मनसेचे निवडणूक आयोगाला सहा प्रश्न, निवेदनात काय म्हटलंय?