-
हिरवीगार, लांब केळीची पाने लग्नसमारंभ, बरेच पारंपरिक उत्सव आणि पाककृती तर नैवेद्यासाठीसुद्धा हमखास वापरली जातात असे म्हणायला हरकत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? या सगळ्या गोष्टींसाठी केळीची पाने का वापरली जातात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
क्रिश अशोक यांनी त्यांच्या नवीन रील व्हिडीओमध्ये केळीची पाने वापरण्यामागील “विज्ञान” नमूद केलं आहे. केळीच्या पानात काही सुगंधी व आरोग्यदायी पॉलीहेनॉल्स आहेत, जे तुम्ही फक्त केळीच्या पानावर अन्न वाढून खाल्ल्यावर नाही तर यासाठी तुम्हाला केळीच्या पानात अन्न वाफवून त्याचे सेवन करावे लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
द इंडियन एक्स्प्रेसने के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ, डॉक्टर मोनल वेलांगी (पीएचडी) यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, केळीच्या पानांना खूप वेगळी अशी मातीची चव असते आणि त्याच्या पृष्ठभागावर थोडासा मेणासारखा लेप असतो, यामध्ये फायबर सामग्री सुमारे ७२ टक्के असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मानवी शरीरात सेल्युलेजची कमतरता असते, त्यामुळे केळीचे पान पचण्यास कठीण जाऊ शकते. पण, केळीच्या पानाचे काही आश्चर्यकारक गुणधर्म आहेत, ज्याचा फायदा स्वयंपाक करताना घेता येतो, ते पुढीलप्रमाणे… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केळीची पाने वाफवलेले मोदक, मोमो आणि मासे यांसारखे काही पदार्थ शिजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच ही पद्धत एक आरोग्यदायी स्वयंपाक पर्याय म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
एखादा पदार्थ वाफवताना केळीच्या पानांपासून मिळणारा रस, त्यांच्या गोड मातीचा सुगंध यामुळे अन्नाला एक अनोखा स्वादिष्टपणा येतो. याव्यतिरिक्त, केळीच्या पानातील अर्क अन्नामध्ये प्रवेश करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केळीच्या पानांमध्ये अन्न वाफवल्यावर किंवा शिजवल्यावर पानांमधून पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्सदेखील बाहेर पडतात, जे अन्नात प्रवेश करतात आणि हे शरीराला अँटिऑक्सिडंट फायदे देतात. हे अँटिऑक्सिडंट्स मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या रोगांपासून दूर ठेवण्यात मदत करू शकतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
दक्षिण भारतात केळीच्या पानांचा मोठा आकार आणि लवचिक स्वरूपाचा उपयोग घरामध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्यासाठी केला जातो. पण, असं करताना पाने पूर्णपणे स्वच्छ करणे आणि ताजी पाने निवडणे महत्वाचे आहे, असे डॉक्टर मोनल वेलांगी सांगतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल