-
ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना खूप महत्वपूर्ण मानले जाते. प्रत्येक ग्रह त्याच्या निश्चित वेळेनंतर राशी परिवर्तन करतो, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार जूनमध्येही काही ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ४ ते २९ जूनपर्यंत सूर्य, बुध आणि शुक्र आणि मंगळ हे ग्रह राशी परिवर्तन करतील. त्यामुळे या महिन्यात बुध, गुरू आणि सूर्यामुळे त्रिग्रही योग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य-बुधाच्या युतीमुळे बुधादित्य आणि शुक्र-बुधामुळे मालव्य आणि भद्र राजयोग निर्माण होईल. ज्याचा प्रभाव १२ राशीपैकी काही राशीच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
बुधाचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींना जून महिन्यातील ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा पाहायला मिळेल. या काळात आयुष्यात काही सकारात्मक बदल होतील. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ग्रहांचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात अनेक समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील ग्रहांचे राशी परिवर्तन खूप खास असेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल