-
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली.
-
रविवारी सकाळी ७ वाजता ईडीची टीम संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवास्थानी पोहोचली होती.
-
या ठिकाणी तब्बल नऊ तास संजय राऊत यांच्यसह त्यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. नऊ तासानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन पुन्हा चौकशी देखील करण्यात आलीय अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली.
-
दरम्यान, रविवारी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. तसेच त्याच्या परिवारातील इतर सदस्यदेखील भावूक झाल्याचे बघायला मिळाले.
-
आज उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी राऊतांच्या भांडूप येथील घरी दाखल झाले होते.
-
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आईंनी भेट घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांनादेखील धीर देण्याचा प्रयत्न केला.
-
”संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे”, असा शब्द त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांना दिला.
-
संकटाच्या काळात शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे, हे दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.
-

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’