-
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस शिल्लक आहेत. अशामध्ये आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. (Photo Source: Kirit Somaiya/Facebook Page)
-
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षांवर भ्रष्टाचाराचे विविध आरोप करणारे, भाजपा नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Photo Source: Kirit Somaiya/Facebook Page)
-
मविआ सरकारमधील नेत्यांचे, मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्यामागचे कारण सोमय्या यांनी सांगितले आहे. ते मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (Photo Source: Kirit Somaiya/Facebook Page)
-
२०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युतीचे सरकार येता येता राहिले. त्यानंतर उध्दव ठाकरे मविआ आघाडी बनवून मुख्यमंत्री झाले. तर मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. फडणवीस विविध स्तरांवर ठाकरे सरकारला विधानसभेत घेरत होते तर विधानसभेच्या बाहेर किरीट सोमय्या मविआ सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणत होते. (Photo Source: Kirit Somaiya/Facebook Page)
-
हे सर्व का केले गेले याबद्दल किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. “मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी मला दिल्लीतून सांगण्यात आलं होतं. तसचं देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं होतं. फडणवीसांना पक्षानेच तो आदेश दिला होता.” असं सोमय्या यांनी सांगितलं आहे. (Photo Source: Kirit Somaiya/Facebook Page)
-
“ठाकरेंच्या सरकारमधील नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणे गरजेचे होते. तसे केले नसते तर शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी भाजपा संपवली असती, विरोधकांना संपवले असते, तुरुंगात टाकले असते.” असाही खुलासा त्यांनी केला आहे. (Photo Source: Kirit Somaiya/Facebook Page)
-
महायुती सरकारमध्ये सामील असलेले नेते तेच आहेत ज्यांच्यावर तुम्ही घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत? या प्रश्नावर किरीट सोमय्या यांनी “भ्रष्टाचार सुरू झाला तर मी परत त्याविरुद्ध आवाज उठवणार” असे स्पष्ट केले आहे. सोमय्या पुढे म्हणाले की “आम्ही कोणत्याही नेत्यावरील केस मागे घेतलेली नाही. त्यांच्यावरील कारवाया सुरू आहेत. ज्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या त्या अजूनही जप्तच आहेत.” (Photo Source: Kirit Somaiya/Facebook Page)
-
“वाशिममध्ये भावना गवळी यांच्या मतदासंघांपैकी एका गावातील रस्त्यात लोकांनी मला घेराव केला होता. दगडफेक केली होती. त्यातून मी जेमतेम वाचलो होतो. या घटनेनंतर १० मिनिटांनी अमित शाह यांचा फोन आला आणि विचारणा केली कुठे लागलं का? आणि दुसऱ्या दिवशी मला झेड सिक्युरिटी देण्यात आली. पक्षाने मला हे संरक्षण देऊन माझ्या कामाची पोचपावती दिली होती” अस यावेळी सोमय्या यांनी सांगितले आहे. (Photo Source: Kirit Somaiya/Facebook Page)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्