-
१३ ते १५ जून दरम्यान आयोजित जी-७ नेत्यांच्या शिखर परिषदेचा काल पहिला दिवस होता, काल इटलीने या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. अपुलिया प्रदेशातील बोर्गो एग्नाझिया या लक्झरी रिसॉर्टमध्ये परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. (AP photo)
-
या शिखर परिषदेत इटली, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधी एकत्र आले, यामध्ये भारतही सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये पोहचले आहेत. (AP photo)
-
यावेळी मुख्य चर्चा ती जागतिक संघर्षांवर, विशेषत: रशिया-युक्रेन युद्ध आणि गाझामधील इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षावर. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्हालोदोमीर झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्ध युक्रेनच्या संरक्षणास बळ देण्यासाठी १० वर्षांच्या सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली. (AP photo)
-
चीन, इस्रायल, किरगिझस्तान आणि तुर्की या देशांसह रशियाला लष्करी वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या संस्थांना लक्ष्य करून यूकेने नवीन धोरणांची घोषणा केली. युक्रेनमधील रशियाची युद्ध क्षमता कमकुवत करण्याचा या धोरणामागचा उद्देश आहे. (AP photo)
-
या व्यतिरिक्त, जी-७ नेत्यांनी युक्रेनसाठी ५० अब्ज डॉलर्सच्या कर्जावर सहमती दर्शविली, जी-७ देशांनी रशियाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा यासाठी वापर करण्यावर जोर दिला. (AP photo)
-
जी-७ करारांतून सुरक्षित आणि कायद्यानुसार वेगळे होण्याची मागणी इटलीने केली, या मागणीने सर्वांचे लक्ष वेधले. या मुद्द्यावरून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात खडाजंगी झाली. जॉर्जिया यांनी आगामी फ्रान्समधील निवडणुकांपूर्वी मॅक्रॉन राजकीय फायदा करून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. (AP photo)
-
जी-७ परिषदेतील आगामी चर्चेसाठी घेण्यात आलेल्या इतर मुद्द्यांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) तसेच स्थलांतराचा मुद्दा होता. आफ्रिकेतून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर होत असल्यामुळे तो इटलीसाठी एक महत्त्वाचा चिंतेचा विषय मानला जात असून त्यावर चर्चा झाली. (AP photo)
-
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला पोहोचले आहेत. (Narendra Modi/X)
-
यावेळी विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. आज आणि उद्या १४, १५ जून रोजी नरेंद्र मोदी या शिखर परिषदेत सहभाग नोंदवणार आहेत. (Narendra Modi/X) हेही पहा- PHOTOS : सिक्कीममध्ये भूस्खलन, पावसाने केला कहर; एकाचा मृत्यू तर ५ जण बेपत्ता…

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक