-
RCB V/s LSG
आयपीएलचा शेवटचा लीग सामना आज बंगळुरू आणि लखनऊ यांच्यात होणार आहे. (Photo: IPL/ Social Media) -
आरसीबीसाठी महत्त्वाचा सामना
आरसीबीसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. जर आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांना टॉप-२ मध्ये स्थान मिळेल. (Photo: IPL/ Social Media) -
सामना हरल्यास काय?
बंगळुरु आजचा हा सामना हरली तर ते तिसऱ्या क्रमांकावर राहतील आणि त्यांना आणखी एक एलिमिनिटर सामना खेळावा लागेल, जो मुंबईविरुद्ध असेल. (Photo: IPL/ Social Media) -
१७ वर्षांत अनेक वेळा पात्रता मिळवली आहे.
जरी आरसीबी संघाने १७ वर्षात एकही विजेतेपद जिंकलेले नसले तरी, आयपीएलच्या संपूर्ण इतिहासात त्यांची कामगिरी फारशी निराशाजनक राहिलेली नाही. (Photo: IPL/ Social Media) -
अंतिम फेरीही गाठली आहे
हा संघ सातत्याने प्लेऑफसाठी पात्र ठरलेला आहे. तसेच अनेक वेळा अंतिम फेरीतही पोहोचला आहे. पण त्यांना विजय मिळवता आलेला नाही. (Photo: IPL/ Social Media) -
तीन अंतिम सामने
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत तीन आयपीएल फायनल खेळले आहेत, परंतु तिन्ही जेतेपदाच्या सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Photo: IPL/ Social Media) -
२००९ मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीत
आरसीबीचा संघ २००९ मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता, निर्णायक मुकाबला रोहित शर्माचा संघ डेक्कन चार्जर्सने जिंकला होता. या सामन्यात आरसीबीला १४३ धावांचे लक्ष्य मिळाले होते परंतू संघाला ६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. (Photo: IPL/ Social Media) -
२०११ मध्ये चेन्नईकडून पराभव
बंगळुरूने २०११ मध्येही अंतिम सामन्यात एन्ट्री केली होती.
पण यावर्षी त्यांना जेतेपदाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. जेतेपदाच्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जने आरसीबीचा ५८ धावांनी पराभव केला आणि पुन्हा एकदा संघ आयपीएल जिंकण्याच्या आपल्या स्वप्नापासून दूर राहिला. (Photo: IPL/ Social Media) -
सनरायझर्स हैदराबादकडून पराभव
याआधी बंगळुरूने २०१६ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अंतिम सामना खेळला आणि त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. आरसीबीने हा सामना ८ धावांनी गमावला होता. (Photo: IPL/ Social Media) -
(Photo: IPL/ Social Media) हेही पाहा- अंजली आणि सचिन तेंडुलकर यांच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण, पाहा लेक साराने शेअर केलेले Unseen Photos

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..