-
मोडला मायकेल हसीचा विक्रम
रोहित शर्मा आयपीएल प्लेऑफमध्ये ८० पेक्षा जास्त धावा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या ३८ वर्षे आणि ३० दिवसांत हे यश मिळवले. मायकेल हसीने ३७ वर्षे आणि ३५९ दिवसांच्या वयात हेच केले होते. (Photo: BCCI) -
षटकारांचे त्रिशतक ठोकणारा पहिला भारतीय
रोहित शर्माने आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात ३०० षटकारांचा टप्पा ओलांडला. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. (Photo: BCCI) -
रोहितचे नाव एकूण यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ख्रिस गेल ३५७ षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
-
प्लेऑफमध्ये मुंबईसाठी खेळला सर्वात मोठा डाव
रोहित शर्मा आयपीएल प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडू बनला आहे. (Photo: Social Media) -
त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. ज्याने २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाबाद ७१ धावा केल्या होत्या. रोहितने गुजरातविरुद्ध ८१ धावांची खेळी केली. (Photo: Social Media)
-
अनिल कुंबळे क्लबमध्ये सामील
रोहित शर्मा आयपीएल प्लेऑफमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. (Photo: Social Media) -
या यादीत अनिल कुंबळे सर्वात वर आहे. त्याने ३८ वर्षे आणि २१९ दिवसांच्या वयात सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. (Photo: Social Media)
-
ख्रिस गेलच्या पुढे
रोहित शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. (Photo: Social Media) -
रोहितने मुंबई इंडियन्ससाठी २६७ षटकार मारले आहेत. आरसीबीकडून क्रिस गेलने २६३ षटकार मारले होते. हेही पाहा- वैभव सूर्यवंशीने घेतले पंतप्रधानांचे आशीर्वाद; पीएम नरेंद्र मोदी आणि वैभव सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या भेटीचे फोटो व्हायरल…

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL