-
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने इतिहास रचला आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना गिलने दमदार द्विशतकी खेळी केली. (Photo: X)
-
शुबमन गिल हा परदेशात (दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड) सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. (Photo: AP)
-
दरम्यान, शुबमन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचवेळा चर्चेच असतो. गिलचे नाव आतापर्यंत अनेक सुंदरींशी जोडले गेले आहे, त्याच्या लव्हलाईफ बद्दल जाणून घेऊयात… (File Photo)
-
सारा तेंडुलकर
शुभमन आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा असतात. अलिकडेच या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या आहेत, दरम्यान, त्यांनी एकमेकांना डेट केले आहे का नाही? किंवा त्यांचे ब्रेकअप झाले आहे का? याला अधिकृतपणे दुजोरा देणारी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Photo: Instagram) -
सारा अली खान
शुभमन गिल आणि सारा अली खान यांच्या अफेअरच्या बातम्या अनेक दिवसांपासून रंगतात, पण त्यांनी अजून यावर अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. (Photo: Instagram) -
साराला अली खानने एका मुलाखतीत सांगितले की, ती सध्या तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. (Photo: Instagram)
-
अनन्या पांडे
शुभमन गिल आणि अनन्या पांडे यांच्या अफेअरच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. अनेकदा दोघांची नावे एकत्र घेतली जातात, त्यांनी एकत्र एक जाहिरात शूट केली होती त्यानंतर या चर्चा वाढल्या होत्या. (Photo: Instagram) -
रिद्धीमा पंडित
शुभमन गिल आणि रिद्धीमा पंडित यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे ते दोघेही चर्चेत आहेत. रिद्धीमा पंडितने शुभमन गिलसोबतच्या अफेअरच्या बातम्या फेटाळल्या आहेत. (Photo: Instagram) -
सोनम बाजवा
सोनम बाजवा ही एक पंजाबी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी, शुभमन गिल सोनम बाजवासोबत एका शोमध्ये दिसला होता, आणि तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. सोनम बाजवा आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. (Photo: Instagram) हेही पाहा- Amarnath yatra 2025: अमरनाथ यात्रा भारतातली सर्वात कठीण यात्रा का आहे? जाणून घ्या…

BJP New Woman President : भाजपाला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? निर्मला सीतारमण यांच्यासह ‘ही’ दोन नावे शर्यतीत