-
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ चा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात झाला, यामध्ये आफ्रिकेने विजय मिळवला. (Photo: Karishma Kotak/Instagram)
-
दरम्यान, या सामन्यानंतर, WCL च्या मालकाने लाईव्ह टीव्हीवर अँकरला प्रपोज केले. त्यानंतर अँकर करिश्मा कोटकची खूप चर्चा होत आहे. कोण आहे ही ग्लॅमरस अँकर? चला जाणून घेऊयात… (Photo: Karishma Kotak/Instagram)
-
करिश्मा कोटक
करिश्मा कोटक ही एक टीव्ही प्रेझेंटर आहे. ती एक प्रेझेंटर असण्याबरोबरच ब्रिटिश मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. एवढेच नाही तर तिने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. तिचा जन्म २६ मे १९८२ रोजी लंडनमध्ये झाला आहे. (Photo: Karishma Kotak/Instagram) -
प्रपोज
WCL च्या मालकाचे नाव हर्षित तोमर आहे. अंतिम सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन दरम्यान हर्षितने लाईव्ह टीव्हीवर करिश्माला प्रपोज केले आणि ते कॅमेरात कैदही झाले. तोमर म्हणाला की ‘हे सर्व संपताच मी कदाचित तुला प्रपोज करेन.’ यावर करिश्मा ‘अरे देवा’ म्हणताना दिसतेय. (Photo: Karishma Kotak/Instagram) -
WCL 2025
करिश्माने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये काम केले आहे. तिने WCL 2025 मध्ये तिचं काम खूप छान पद्धतीने पार पाडले आहे. (Photo: Karishma Kotak/Instagram) -
सौंदर्य
करिश्मा कोटक खरोखरच खूप सुंदर आहे. ती स्वतः एक अभिनेत्री आहे. तिचे सौंदर्य पाहून कोणीही वेडे होईल. करिश्मा दिसण्यात एखाद्या परीपेक्षा कमी नाही. (Photo: Karishma Kotak/Instagram) -
सोशल मीडिया
करिश्मा कोटक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २० लाख फॉलोअर्स आहेत. ती तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहते. (Photo: Karishma Kotak/Instagram) -
अभिनय
करिश्मा कोटकने दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी आणि बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. २०१२ मध्ये ती ‘बिग बॉस सीझन ६’ मध्ये दिसली. (Photo: Karishma Kotak/Instagram) -
बालपण
करिश्माचे वडील भारतीय वंशाचे होते आणि तिची आई पूर्व आफ्रिकन वंशाची आहे. तिने तिचे सुरुवातीचे शिक्षण लंडनमध्येच घेतले. तिने १६ व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आणि तेव्हापासून ती फॅशन आणि मनोरंजन उद्योगात सतत सक्रिय आहे, परंतु हर्षित तोमरने तिला लाईव्ह टीव्हीवर प्रपोज केल्यावर ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. (Photo: Karishma Kotak/Instagram) -
फोटो
दरम्यान, या प्रपोजनंतर काही वेळाने हर्षितने इन्स्टाग्रामवर करिश्मासोबतचा हा फोटोही शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शनमध्ये लाल रंगाचा हार्ट इमोजीही जोडला आहे. (Photo: Harshit Tomar/Instagram) हेही पाहा-ऐश्वर्याची डुप्लिकेट, सलमान खानबरोबर झळकलेली स्नेहा उल्लाल सध्या काय करते? गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल…

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”