IPS Mohita Sharma : सोनी टिव्हीवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC 12) च्या १२ व्या हंगामातील दुसरा करोडपती स्पर्धक मिळाला आहे. विशेष म्हणजे.. या हंगामातील दोन्ही करोडपती स्पर्धक महिलाच आहेत..रांची येथील नाजिया नसीम यंदाच्या हंगामातील पहिली करोडपती स्पर्धक ठरली होती. आता या हंगामातील दुसरी करोडपती स्पर्धक दिल्लीची मोहिता शर्मा ठरली आहे. मोहिता शर्मा आयपीएस(IPS) अधिकारी आहेत. जाणून घेऊयात मोहिता शर्मा यांच्याबद्दल ३१ वर्षय मोहिता शर्मा मूळच्या हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथील आहेत. त्यांचं सर्व शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे. मोहिता शर्मा या २०१७ बॅचच्या आयपीएस आधिकारी आहेत. सध्या त्या जम्मू-कश्मीरमध्ये कार्यरत आहेत. याआधी मोहिता शर्मा यांनी भारतीय निवडणूक आयोगात काम केलं आहे. मोहिता शर्मा यांचे वडील मानेसर येथील मारुती उद्योग लिमिटेड या कंपनीमधये काम करत होते. मोहिता शर्मा यांनी दिल्लीमधील द्वाराका डीपीएसमध्ये आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. तर भारती विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. बीटेकचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१२ पासून मोहिता शर्मा यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. पाचव्या प्रयत्नात मोहिता शर्मा यांना यूपीएससीमध्ये यश मिळालं आणि त्या आयपीएस आधिकारी झाल्या. ऑक्टोबर २०१९ मध्ये मोहिता यांनी आयएफएस आधिकारी रुशल गर्ग यांच्यासोबत लग्न केलं.

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला ‘आदेश’, त्यांच्याकडून लगेच मान्यही….