-
Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून काल, रविवारी सुटीचे निमित्त साधून मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ठिकठिकाणच्या गणेश कार्यशांळामधून मूर्ती ढोल-ताशाच्या गजरात मंडपस्थळी आणल्या. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे लालबाग, परळ, गिरगाव आदी भागांमध्ये उत्सवी वातावरण होते. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
गेल्या दोन वर्षांत करोना संसर्गाच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन गणेशोत्सवात आगमन-विसर्जन मिरवणुकींना परवानगी देण्यात आली नव्हती. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
-
मात्र करोनाचे संकट नियंत्रणात आल्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईमधील काही सार्वजनिक गणेश मंडळांनी ७ ऑगस्टपासून गणेशमूर्ती मंडपस्थळी नेण्यास सुरुवात केली. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
ढोल-ताशाचा गजर, गुलालाची उधळण आणि फडकणारे भगवे झेंडे यामुळे अवघे वातावरण भक्तीमय झाले होते. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
गणेशोत्सव बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
गणेश आगमनाच्या मिरवणुकांमुळे लालबाग, परळ आणि परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
मिरवणुकांमुळे अधिक संख्येने मूर्तीकार्यशाळा असलेल्या लालबाग, परळ आदी भागांतील वाहतुकीचे पोलिसांना सकाळपासूनच नियोजन करावे लागले. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
“२८ ऑगस्ट रोजी मंडपस्थळी रवाना झाल्या आहेत. गणेशोत्सव ३१ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. कार्यशाळेतील उर्वरित गणेशमूर्ती या दिवशी मंडपस्थळी रवाना होतील.” – रेश्मा खातू, मूर्तिकार (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
-
हेही पाहा : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ‘या’ प्रसिद्ध गणपती मंदिरांना नक्की भेट द्या (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

Vaishnavi Hagawane Case: राजेंद्र हगवणेला आश्रय देणं भोवलं; माजी मंत्राच्या मुलासह पाच जणांना बेड्या