-
स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ही नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे.
-
आजपासून तब्बल एका वर्षांनी ही बोट नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.
-
नुकतंच आयएनएस विक्रांत ही युद्धनौका कोची बंदरातून खोल समुद्रात नेण्यात आली.
-
या हायटेक युद्धनौकेच्या समुद्री चाचण्या सुरुवात करण्यात आल्या आहेत.
-
भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्डचा स्वदेशी बनावटीचा पहिली विमानवाहू युद्धनौका बनवण्याचा हा पहिला प्रयत्न आहे.
-
ही युद्धनौका २६२ मीटर लांब, ६२ मीटर रुंद आणि ५९ मीटर उंच आहे. यात एकूण १४ मजले एवढी एकूण उंची आहे.
-
या युद्धनौकेत २३०० हून अधिक रुम्स आहेत.
-
यात जवळपास १७०० नौसैनिकांना राहण्याची सुविधा करण्यात आली आहे
-
विशेष बाब म्हणजे यात महिला अधिकाऱ्यांसाठी खास सुविधा करण्यात आली आहे.
-
आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचा वेग सुमारे 28 नॉट्स आणि क्रूझिंग स्पीड सुमारे 18 नॉटिकल मैल आहे. म्हणजेची ही नौका ताशी 33 किलोमीटर या वेगाने समुद्रात संचार करू शकते.
-
आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे वजन ४० हजार टन इतके आहे.
-
या युद्धनौकेवरून लढाऊ विमान आणि विविध हेलिकॉप्टर यांची पूर्ण क्षमतेने उड्डाणे होतील.

Tv Actress Son : मुंबईत टीव्ही अभिनेत्रीच्या १४ मुलाने आयुष्य संपवलं, ट्युशनला जायला सांगितल्याने इमारतीवरुन मारली उडी