-
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा भारतीय वाहन बाजारात दबदबा वाढू लागला आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा कंपनीच्या दोन कार्सना बाजारात तुफान मागणी आहे. या तगड्या मागणीमुळे कंपनीने दोन्ही कार्ससाठी बुकिंग्स घेणं थांबवलं आहे. (PC : Toyota Bharat)
-
या दोन्ही हायब्रिड कार्स आहेत. इनोव्हा हायक्रॉस आणि अर्बन क्रूझर हायरायडर अशी या दोन्ही कार्सची नावं आहेत. (PC : Toyota Bharat)
-
कंपनीने त्यांच्या डीलर्सनादेखील सांगितलं आहे की, या दोन कार्ससाठी सध्या बुकिंग्स घेऊ नका. (PC : Toyota Bharat)
-
या दोन्ही कार्ससाठी इतक्या मोठ्या प्रमाणात बुकिंग्स येत आहेत, ज्यामुळे कंपनीचं उत्पादन आणि वितरणाचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे भविष्यात वितरणात अडचणी येऊ नयेत यासाठी कंपनीने बुकिंग्स घेणं तात्पुरतं थांबवलं आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा आणि सुझुकी या दोन कंपन्यांनी एकत्र येत हायब्रिड मॉडेल्स विकसित करून लाँच केले. या मॉडेल्सना भारतीय वाहन बाजारात तगडी डिमांड आहे. (PC : Toyota Bharat)
-
या दोन्ही कार्सचं दमदार मायलेज हे तुफान मागणीचं प्रमुख कारण आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा हायरायडर कारचं मायलेज २७.९७ किमी प्रति लीटर इतकं आहे, तर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही कार २१.१ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. (PC : Toyota Bharat)
-
तगड्या मायलेजमुळे ग्राहक या कार्सच्या हायब्रिड मॉडेल्सना प्राधान्य देत आहेत. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटाच्या काही डिलर्सकडून माहिती मिळाली आहे की, हायक्रॉस आणि हायरायडर कारच्या टॉप स्पेक व्हेरिएंटला जोरदार मागणी आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा हायक्रॉस ZX (O) कारवरील वेटिंग पीरियड २.५ वर्षांवर पोहोचला आहे तर हायक्रॉस VX या व्हेरिएंटवरील वेटिंग पीरियड ८ ते १२ महिन्यांवर पोहोचला आहे. (PC : Toyota Bharat)
-
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर या कारवरील वेटिंग पीरियड शहरांमध्ये एक वर्षापेक्षा जास्त आहे. तर उर्वरीत भारतात ८ ते ११ महिने इतका आहे. (PC : Toyota Bharat)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…