-
सायप्रस हा पूर्व भूमध्य समुद्रात स्थित असलेला एक बेट देश आहे. या देशाच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले आहेत. त्यांचा या देशातला दौरा दोन दिवसांचा आहे. (Photo: Google Map)
-
दरम्यान सायप्रस हा देश ग्रीसच्या आग्नेयला, तुर्कीच्या दक्षिणेस, सीरिया आणि लेबनॉनच्या पश्चिमेस आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वायव्येस स्थित आहे. (Photo: Pexels)
-
भौगोलिकदृष्ट्या, तो पश्चिम आशियाचा भाग मानला जातो, परंतु सायप्रसचे सांस्कृतिक आणि राजकीय संबंध मोठ्या प्रमाणात युरोपियन आहेत. (Photo: Pexels)
-
सायप्रस १ मे २००४ पासून युरोपियन संघाचा सदस्य आहे. तर निकोसिया हे शहर सायप्रसची राजधानी आहे. (Photo: Pexels)
-
प्रागैतिहासिक काळापासून मानवी वास्तव्य असलेल्या सायप्रस बेटावर इ.स.पूर्व ३३३ मध्ये अलेक्झांडर द ग्रेटने ताबा मिळवला. त्यानंतरच्या काळात येथे इजिप्त, रोमन साम्राज्य, बायझेंटाईन साम्राज्य, व्हेनिस इत्यादी साम्राज्यांची सत्ता राहिली. (Photo: Pexels)
-
१५७१ साली ओस्मानी साम्राज्याने सायप्रसवर विजय मिळवला व त्यानंतर ३ दशके हा भाग ओस्मानांकडे होता. १८७८ साली सायप्रसला ब्रिटनच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आले. १९६० साली सायप्रसला स्वातंत्र्य मिळाले व १९६१ मध्ये सायप्रस राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य बनला. (Photo: Pexels)
-
सायप्रसच्या दक्षिणेकडील भागात ग्री़क लोकांचे तर उत्तरेकडील भागात तुर्की लोकांचे वर्चस्व पाहायला मिळते, तसेच उत्तर सायप्रस हा स्वतंत्र एक देश असल्याचा दावाही ह्या भागातील लोक करताना पाहायला मिळतात. दरम्यान या गोष्टीला तुर्कीशिवाय इतर कोणत्याही देशाची मान्यता नाही. (Photo: Pexels)
-
सायप्रसची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटन उद्योगावर अवलंबुन आहे. येथील दरडोई उत्पन्न उच्च आहे. (Photo: Pexels)
-
सायप्रसची एकूण लोकसंख्या १० लाख ९९ हजार ३४१ एवढी आहे, तर या छोट्याश्या देशाचं क्षेत्रफळ ९,२५१ एवढं आहे. (Photo: Pexels) हेही पाहा- Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौऱ्यासाठी सायप्रसची का केली निवड; तुर्कीशी काय आहे कनेक्शन?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…