Kokan Railway : कोकण रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने १९० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील पात्र उमेदवार ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. विविध विभागांमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, ट्रॅक मेंटेनर, गुड्स ट्रेन मॅनेजर, पॉइंट्स मॅन, व्यावसायिक पर्यवेक्षक यांसारख्या पदांसाठी भरती होणार आहे. जमीन गमावणारे उमेदवार, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत उमेदवार आणि KRCL कर्मचारी यांना प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा १८ ते ३६ वर्षे आहे.