ब्रेन ट्युमर झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा जैन धर्मातील ‘संथारा व्रता’नंतर मृत्यू
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ब्रेन ट्युमर झालेल्या तीन वर्षीय वियाना जैन हिने संथारा व्रत केल्याने तिचा मृत्यू झाला. संथारा व्रत म्हणजे स्वेच्छेने मृत्यूपर्यंत उपवास करणे. वियानाचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये "जैन विधी संथारा व्रत करणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती" म्हणून नोंदवले गेले. तिच्या पालकांनी तिच्या वेदनांमुळे हा निर्णय घेतला.