अतुल सुभाषच्या पत्नीला नोटीस, तीन दिवसांत हजर होण्याचे आदेश!
पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या अतुलच्या पत्नीला पोलिसांनी तीन दिवसांची नोटीस बजावली आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील त्यांच्या निवासस्थानी ही नोटीस लावण्यात आली आहे. अतुलने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ आणि चिठ्ठीत पत्नी व सासरच्यांवर गंभीर आरोप केले होते. अतुलच्या भावाने पत्नी निकिता सिंघानियाविरोधात तक्रार दाखल केली आहे. निकिता यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही, उत्तर न दिल्यास अटक होऊ शकते.