“फोटो, व्हिडिओ असतील तर द्या”, पहलगाम हल्ल्याच्या चौकशीसाठी NIA चं स्थानिकांना आवाहन
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी पर्यटक आणि स्थानिकांना व्हिडिओ आणि फोटो सामायिक करण्याचे आवाहन केले आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. एनआयएने आतापर्यंत १०० स्थानिकांची चौकशी केली असून, अनेक व्हिडिओ आणि फोटो जप्त केले आहेत. तपासासाठी ९६-५४-९५८-८१६ किंवा ०११-२४३६८८०० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.